"सर, प्लीज मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील"; उत्तरपत्रिकेचा फोटो तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:44 PM2024-03-12T12:44:28+5:302024-03-12T12:52:32+5:30

परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी कविता तर काहींनी इमोशनल नोट्स लिहिल्या आहेत.

please pass kar do sir nahi to papa shadi kar denge girl student wrote emotional note in exam | "सर, प्लीज मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील"; उत्तरपत्रिकेचा फोटो तुफान व्हायरल

"सर, प्लीज मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील"; उत्तरपत्रिकेचा फोटो तुफान व्हायरल

परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकेचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. असाच एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यात लिहिलेली उत्तरं वाचून शिक्षकही हैराण झाले आहेत. बिहार बोर्डाच्या मॅट्रिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी कविता तर काहींनी इमोशनल नोट्स लिहिल्या आहेत.

एका विद्यार्थिनीने विनंती केली आहे की, सर मला पास करा, नाहीतर माझे पप्पा माझं लग्न लावून देतील. आराच्या मॉडेल स्कूलमध्ये झालेल्या बिहार बोर्डाच्या मॅट्रिक परीक्षेचे पेपर तपासताना ही अजब घटना घडली. मॅट्रिकची परीक्षा संपल्यानंतर आता पेपर तपासले जात आहे. तपासल्या जात असलेल्या उत्तरपत्रिकेत विचित्र उत्तरं लिहिण्यात आली आहेत.

एका विद्यार्थ्याने लिहिले की माझी आई मजूर म्हणून काम करते. आम्ही खूप गरीब आहोत. मला पास करा. एका विद्यार्थिनीने इमोशनल नोट लिहिली आहे - माझे वडील शेतकरी आहेत. शिक्षणाचा खर्च आपण उचलू शकत नाही. म्हणूनच ते मला शिकवू इच्छित नाहीत आणि त्यांनी म्हटलं आहे की जर मी 318 गुण आणले नाही तर ते मला अभ्यास करू देणार नाहीत आणि माझं लग्न लावून देतील. कृपया माझी इज्जत वाचवा. मी गरीब कुटुंबातील मुलगी आहे. माझे वडील शेतकरी आहेत, त्यांना 400 रुपयेही मिळत नाहीत.

विद्यार्थी या प्रकारच्या नोट्स त्यांच्या उत्तरपत्रिकेत लिहित आहेत. बिहार बोर्डाने जिल्ह्यात पेपर तपासण्यासाठी सहा केंद्रे तयार केली आहेत. शिक्षकांना उत्तरपत्रिकेत कविता, शायरी, प्रार्थना आणि नोट्स मिळत आहेत. शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप काही भावनिक लिहिलेलं पाहायला मिळतं. 
 

Web Title: please pass kar do sir nahi to papa shadi kar denge girl student wrote emotional note in exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.