Merry Christmas: "मला फक्त मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवेत", चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 05:22 PM2022-12-15T17:22:26+5:302022-12-15T17:23:21+5:30

8 वर्षीय चिमुकलीने सांताक्लॉजला एक भावनिक पत्र लिहले आहे.

Please, Santa i want money for Mummy and Daddy 8-year-old girl writes emotional letter  | Merry Christmas: "मला फक्त मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवेत", चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र 

Merry Christmas: "मला फक्त मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवेत", चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र 

googlenewsNext

नवी दिल्ली : ख्रिसमस जवळ आला आहे आणि यासाठी लहान मुले सांता क्लॉजकडून काही खास भेटवस्तू मागत असतात. बहुतांश मुले त्यांच्या आवडत्या मिठाई, खेळणी इत्यादी मागतात. मात्र आठ वर्षांच्या मुलीने सांताला लिहिलेले हृदयद्रावक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पत्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये चिमुकलीने सांताक्लॉजकडे आपल्या आई-वडिलांसाठी पैसे मागितले आहेत. 

हे पत्र शेअर करताना युजरने लिहले, "माझ्या बहिणीला नुकतेच सांताला पाठवलेले हे पत्र सापडले. जे तिच्या 8 वर्षांच्या मुलीने लिहिलेले आहे. एवढी लहान मुलगी या गोष्टीचा विचार करत आहे हे पाहून मला खूप रडू आलं!." या पत्रात 8 वर्षीय चिमुकलीने लिहले की, "प्रिय सांता, या ख्रिसमससाठी मला माझ्या मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवे आहेत. ते बिल भागवण्यासाठी खूप कष्ट करतात. मलाही वाईट वाटते. त्यामुळे प्रिय सॅंटा, तू हे काम करशील का? मी यासाठी दिलगीर आहे सॉरी, एम्मी."

चिमुकलीने सॅंटाला लिहले भावनिक पत्र 
एमीने सांताला लिहिलेल्या पत्रात भावनिक संदेश देण्यात आला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटिझन्सचे डोळे पाणावले आहेत. एका युजरने म्हटले, "अश्रू आणि सर्व काही. ते आमच्याकडून जगण्याची अपेक्षा कशी करू शकतात हे क्रूर आहे." इतरही सोशल मीडियावरीस युजर्संनी चिमुकलीचे कौतुक केले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

Web Title: Please, Santa i want money for Mummy and Daddy 8-year-old girl writes emotional letter 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.