Video: पोलीस आंबा खात असतानाच माकडाने कारजवळ लावली हजेरी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:40 PM2022-06-14T16:40:17+5:302022-06-14T16:41:07+5:30
तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ, तुम्ही पाहिलात का?
Police Mango and Monkey Viral Video | सोशल मीडियावर कधी कोणत्या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होईल ते सांगता येत नाही. प्रत्येक तासाला वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. पण त्यापैकी काही व्हिडीओ असतात जे साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ बराच व्हायरल होत असून हा व्हिडीओ लोकांच्या मनाला सुखावणारा आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी हा व्हिडीओ ट्वीट केला असून या व्हिडीओमधील पोलिस कर्मचाऱ्याच्या माणुसकीचे भरपूर कौतुक केले जात आहे.
साधारणपणे पोलिस कर्मचारी हे अतिशय शिस्तप्रिय आणि कणखरपणे वागणारे असतात. पण सध्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच वाहवा मिळवली आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनमधील एक पोलिस कर्मचारी एका ठिकाणी शांतपणे कारचा दरवाजा उघडा ठेवून बसला आहे. तो पोलिस कर्मचारी आंबा खात असताना तेथे माकड आपल्या पिलाला पाठीवर घेऊन येते. त्यानंतर तो पोलिस कर्मचारी आपल्या हातातल्या आंब्याची एक फोड छानपैकी कापून त्या माकडाला खायला देतो. माकडदेखील अजिबात घाईगडबड न करता आंब्याची फोड खायला सुरूवात करते. पाहा व्हिडीओ-
UP 112, सबके ‘Mon-key’ समझे..
— UP POLICE (@Uppolice) June 12, 2022
Well Done Constable Mohit, PRV1388 Shahjahapur for making good deeds an 'Aam Baat' #PyarKaMeethaPhal#UPPCarespic.twitter.com/z2UM8CjhVB
हा व्हिडीओ उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या ट्विटला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. या व्हिडीओच्या शेवटी, UPP Cares म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी तुम्हा सर्वांची काळजी आहे, असा संदेशही देण्यात आला आहे.