Duck Family Viral Video: पोलिसांनी बदकाच्या पिलांसाठी थांबवली रस्त्यावरील वाहतूक; नेटकऱ्यांनी केला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:55 PM2022-06-28T17:55:37+5:302022-06-28T17:56:45+5:30
व्हिडीओ पाहून अनेकांनी केलं कौतुक
Duck Family crossing road Viral Video: पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे अतिशय कठोर असतात असा बहुतांश लोकांचा समज असतो. पण तसे अजिबात नाही. पोलीस हे देखील माणसेच आहेत. त्यांच्यातही सामान्य माणसांसारख्याच भावना असतात. पोलीसाच्या वर्दामागील हळव्या स्वभावाचे आणि माणुसकीचे दर्शन काही वेळी आपोआपच घडते. गरज भासल्यास पोलीस कशाचीही तमा न बाळगता जनतेची मदत करतात. इतकंच कशाला.. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तर पोलिस अधिकाऱ्याने एका बदकाच्या कुटुंबाची मदत केल्याचे दिसून आले.
हल्ली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर विविध व्हिडीओ व्हायरल होता. अनेक व्हिडीओ अतिशय छान आणि दर्जेदार असतात. ते व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर फॉरवर्डदेखील केले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावरपोलिसांचा एक चांगला व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पोलीस कर्मचारी बदकांच्या कुटुंबाला रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक थांबवून ठेवतो असा हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ लोकांच्या हृदयाला थेट भिडला आहे. पाहा व्हिडीओ-
Meanwhile in Paris.. 🙏
— Buitengebieden (@buitengebieden) June 26, 2022
🎥 IG: licsu pic.twitter.com/xWRIfKwkXN
बदक आणि चार पिल्ले रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला उभे असतात. या दरम्यान दोन पोलीस तेथे येतात. ते त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करतात. आधी ते हाताच्या इशार्याने वाहतूक थांबवतात आणि नंतर बदकांना आरामात रस्ता ओलांडायला मदत करतात. रस्ता ओलांडल्यानंतर बदके फिरू लागतात, तेव्हाही पोलिस त्यांच्यासोबत चालताना दिसतात.