कैद्यांसोबत अनैतिक संबंध ठेवतात पोलीस अधिकारी?; महिला कैद्याचा धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:09 PM2024-10-14T17:09:49+5:302024-10-14T17:11:49+5:30

कैदी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवतात, दुसरीकडे अधिकारीही त्याचा फायदा घेण्यापासून मागे हटत नाहीत असं तिने सांगितले.

Police officers having immoral relations with prisoners?; The shocking experience of a female prisoner | कैद्यांसोबत अनैतिक संबंध ठेवतात पोलीस अधिकारी?; महिला कैद्याचा धक्कादायक अनुभव

कैद्यांसोबत अनैतिक संबंध ठेवतात पोलीस अधिकारी?; महिला कैद्याचा धक्कादायक अनुभव

जेल, ज्याठिकाणी गुन्हेगारांना त्यांच्या वाईट कृत्याची शिक्षा दिली जाते, एकप्रकारे त्यांना गुन्ह्याची किंमत मोजावी लागते परंतु जेलच्या चार भिंतीआड कैद्यांचे जीवन कसं असतं, एका महिला कैद्याला कसं आयुष्य घालवावं लागते हा अनुभव ऐकला तर तो कल्पनेपलीकडचा आणि अंगावर काटा आणणारा आहे. ब्रिटनच्या फ्रांसेस्का फटोरची कहाणी याच जेलमधील भयानक घटनांवर आधारित आहे जे ऐकून कुणाचाही थरकाप उडेल.

फ्रांसेस्काने ड्रग्स तस्करी प्रकरणात यूकेच्या एचएमपी जेलमध्ये शिक्षा भोगली आहे. अलीकडेच तिने यूकेमधील जेलमध्ये घालवलेल्या क्षणांबाबत ब्रिटनच्या न्यूज चॅनेलची अनुभव शेअर केला. जेलमधील दिवस आठवत फ्रांसेस्का म्हणाली की, जेलच्या आयुष्यात महिला कैदी आणि जेलमधील अधिकारी यांच्यातील अनैतिक संबंध सामान्य बाब आहे. अनेकदा जेव्हा जेलमधील कैद्याला ड्रग्सची तलब लागते तेव्हा ती सौदेबाजी करते. कैदी जेलमधील अधिकाऱ्यांसोबत संबंध बनवतात. त्या बदल्यात त्यांना कोकीन काही ग्रॅम दिले जाते. कैदी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवतात, दुसरीकडे अधिकारीही त्याचा फायदा घेण्यापासून मागे हटत नाहीत असं तिने सांगितले.

जेलमध्ये कुणीही कुणाचा मित्र नसतो

जेलमध्ये कुणी कुणाचा खरा मित्र नसतो, मी माझ्या जेलमधील दिवसात खूप चांगले मित्र बनवले परंतु या गोष्टी हळूहळू जेलमध्ये पसरतात. जेलच्या अधिकाऱ्यांपर्यंतही माहिती होते. जेलमध्ये काम करणाऱ्या पुरुष अधिकाऱ्यांमध्ये नैतिकता कमी आढळते. ते खूप कमी वयाच्या महिलांना नोकरीवर ठेवतात ज्यांच्याकडे आयुष्याचा अनुभव कमी असतो. या महिला सहजपणे कैद्यांजवळ आकर्षिक होतात. ते आम्हाला ओळखतात, जर तुम्ही कुणासाठी आकर्षित होत असाल तर ठीक, परंतु इतक्या छोट्या वयात त्यांच्याकडे आत्मनियंत्रण कमी असते. कैद्यांसोबत संबंध बनवणे चुकीचे आहे हे त्यांना कळत नाही. 

काय आहे फ्रांसेस्काची कहाणी?

फ्रांसेस्काचं संगोपन इंग्लंडच्या रिडिंग शहरात झाले. तिचे बालपण खूप प्रेमळ होते  परंतु ड्रग्सनं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केले. ड्रग्सनं अक्षरश: तिच्या आयुष्यावर कब्जा केला. ती ड्रग्स विक्री करू लागली. ३१ व्या वर्षी तिला पहिल्यांदा ड्रग्स तस्करीत कोर्टासमोर हजर केले. सहा वर्षांनी तिला अटक करण्यात आली. दरम्यान, जेलमधून सुटून आल्यानंतर फ्रांसेस्का आता अशा महिलांसाठी काम करते ज्या जेलमधून बाहेर येऊन जीवन जगत आहेत. या महिलांना रोजगार मिळवून देणे हेच माझे काम असल्याचं ती सांगते.
 

Web Title: Police officers having immoral relations with prisoners?; The shocking experience of a female prisoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.