निर्लज्जपणाचा कळस! स्पेनमध्ये शाळेसमोरील बेंचवर Intimate झालं कपल, मुलांनी त्यांचा व्हिडीओ केला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 10:16 AM2021-04-15T10:16:47+5:302021-04-15T10:21:15+5:30
स्पेनच्या सांताक्रूझ डे टेनरिफ शहरातील या हैराण करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ शाळेतील मुलांनी खिडकीतून रेकॉर्ड केला होता.
आता याला निर्लज्जपणा म्हणा किंवा आणखी काही...स्पेनमध्ये एक कपल चक्क शाळेसमोर शरीरसंबंध ठेवू लागलं. तेही रस्त्याच्या कडेला. त्यांना ना लहान मुलांचा विचार होता ना आजूबाजूने जाणाऱ्या लोकांचा. भर दिवसा ते रस्त्यावर रासलीला करत होते. याची माहिती पोलिसांनी मिळाली तर ते लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कपलला धडा शिकवला. स्पेनच्या सांताक्रूझ डे टेनरिफ शहरातील या हैराण करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ शाळेतील मुलांनी खिडकीतून रेकॉर्ड केला होता.
द सनच्या रिपोर्टनुसार, शाळेसमोरील एक बेंचवर बसून शरीरसंबंध ठेवत होतं. ही संपूर्ण घटना शाळेतील विद्यार्थ्यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. जेव्हा काही लोकांनी कपलला खुलेआम हा कारनामा करताना पाहिलं तर त्यांन पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. तेव्हा कपल रासलीला बंद केली. रिपोर्टनुसार, शरीरसंबंध ठेवण्याआधी टॉपलेस पुरूषाला न्यूड महिलेसमोर काही विचित्र गोष्टी करतानाही पाहिले गेले. त्यानंतर दोघांनी बेंचवर कारनामा सुरू केला. (हे पण वाचा : काय सांगता! न्यूड होऊन डोंगर सर करते ही तरूणी, फोटो व्हायरल झाले तर म्हणाली - 'ही एक कला आहे')
पोलिसांना पाहूनही थांबले नाहीत...
स्थानिक लोकांनी या कपलला शरीरसंबंध ठेवताना पाहिले होते. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले की, सगळं काही शाळेसमोर सुरू होतं. तर शाळेतील विद्यार्थी ही घटना कॅमेरात कैद करत होते. इतकंच काय तर पोलीस पोहोचल्यावरही कपल आपलं 'काम' करण्यात व्यस्त राहिलं. पण जेव्हा अधिकाऱ्यांनी हिसका दाखवला तेव्हा दोघे वेगळे झाले. पोलिसांनी दोघांना चांगलेच सुनावले.
दरम्यान, ही घटना ९ एप्रिलची असल्याचे सांगितले जात आहे. कपलचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. त्यांचे फोटो शेअर केले जात आहेत. सर्वातआधी शाळेतील मुलांनीच त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, पोलीस आल्यानंतर महिलेने स्वत:ला चादरीने छाकलं आहे. मात्र हे स्पष्ट झालं नाही की, पोलिसांनी त्यांना अटक केली की केवळ दंड घेऊन सोडून दिलं.