Rihanna Topless Photo : आता रिहानानं शेअर केला टॉपलेस फोटो; अन् गळ्यात घातलं गणपतीचं पेंडेंट; केंद्रीय मंत्री म्हणाले....
By manali.bagul | Published: February 16, 2021 02:37 PM2021-02-16T14:37:23+5:302021-02-16T14:51:49+5:30
Popstar Rihanna poses topless with Ganesha figurine necklace : रिहानानं केलेले टॉपलेस फोटो शूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पॉपस्टार रिहाना (Popstar Rihanna )आपली गाणी आणि फॅशन सेंसमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर रिहाना चांगलीच चर्चेत आली. आता पुन्हा एकदा रिहाना सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण कोणत्याही वक्तव्यामुळे नाही तर तिच्या फोटोशुटमुळे. रिहानानं केलेले टॉपलेस फोटो शूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
when @PopcaanMusic said “me nuh wan ya wear no lingerie tonight fa me girl” @SavageXFentypic.twitter.com/bnrtCZT7FB
— Rihanna (@rihanna) February 15, 2021
लॉन्जरी ब्रॅण्डसाठी रिहानानं हे फोटोशुट केलं असून या फोटोमध्ये तिनं टॉपलेस (poses topless) पोज दिलेली पाहायला मिळत आहे. यासह तिनं वेगवेगळ्या प्रकारचे दागिनेही घातलेले पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे अशा ड्रेसिंगमध्ये तिनं गळ्यात गणपतीचे पेडेंट असलेली चेन घातली आहे. त्यामुळे तिला खूप ट्रोल केलं जात आहे. नेटिझन्स तिच्या फॅशन सेन्सवर टिकेचा वर्षाव करत आहेत. हा फोटो शेअर करत रिहानानं कॅप्शन दिलं आहे की, when PopcaanMusic said “me nuh wan ya wear no lingerie tonight fa me girl”.
केंद्रीय मंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
आजतकनं दिलेल्या माहितीनुसार रिहानाच्या या फोटोवर केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, 'भारतात सनातन धर्म खूप सहिष्णू आहे. तसंच धैर्यवान आहे. याचा फायदा चित्रपट निर्मात्यांना होतो.' याशिवाय त्यांनी मागील घडलेल्या अशाच प्रकाराचे उदाहरण देत त्यांनी आपला संपात व्यक्त केलं आहे. आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केलं असून ३२ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. रिहानाच्या या कृत्याचं समर्थन कराल का? टॉपलेस होऊन....
बॉलिवूडने रिहानाला सुनावले होते
भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले आणि या मुद्यावरून अख्खा देश ढवळून निघाला होता. रिहानाने आंदोलनाला पाठींबा देताच, भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला. रिहानाच्या या ट्वीटवर भारतात वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया दिल्या. शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधणा-या रिहानाचे काहींनी भरभरून कौतुक केले तर काहींनी आमच्या अंतर्गत मुद्यांत नाक खुपसू नको, अशा शब्दांत रिहानाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. रिहानाच्या जगभर चर्चेत आलेल्या ट्वीटवर बॉलिवूडचे सेलिब्रिटीही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले होते. अक्षय कुमारपासून करण जोहर, अजय देवगण, सुनील शेट्टीपर्यंत अनेकांनी सरकारचे समर्थन करत, रिहानाला अप्रत्यक्षपणे फटकारले होते. PHOTOS: रेड बिकिनी घालून समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली मौनी रॉय, पाहा तिचे हॉट फोटो !