निळ्या डोळ्यांच्या मुलींनाच प्राधान्य; अटीमुळे प्रकरण कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 09:40 AM2023-11-05T09:40:15+5:302023-11-05T09:40:23+5:30
डॉन टॉड (५०) आणि डार्बी क्वेझाडा (४४) अशी त्या दोघींनी नावे आहेत. १
अमेरिकेतील युनायटेड एअरलाइन्सवर नोकरी देताना भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला असून, कोर्टात खटला दाखल झाला आहे. अनुभव न बघता दिसायला सुंदर, रंग गोरा, शरीराने सडपातळ, वयाने तरुण आणि निळे डोळे असलेल्या मुलींनाच एअरलाइन प्राधान्य देते, असा आरोप दोन फ्लाइट अंटेंडंटनी केला आहे.
डॉन टॉड (५०) आणि डार्बी क्वेझाडा (४४) अशी त्या दोघींनी नावे आहेत. १५ वर्षे काम केल्यावरही आम्हाला लॉस एंजेलिस डॉजर्स बेसबॉल टीमसाठी चार्टर फ्लाइट्सवर काम करण्याची परवानगी नाकारली. त्या फ्लाइटमधून उतरवले आणि ‘अटींची पूर्तता’ करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना निवडले. अशा विमानांत काम करण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट पैसे मिळतात, १० वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न केल्यावरही दुर्लक्ष केले, असा दोघींचा आरोप आहे.
‘फ्लाइटची दासी’ म्हणून सहकारी चेष्टाही उडवायचे, अशी टॉडची तक्रार आहे. परिणामी, आर्थिक नुकसान झाले. भेदभाव आणि छळ करून आत्मसन्मान कमी केल्यामुळे मनावर नकारात्मक परिणाम झाला, असे म्हणत त्यांनी भरपाईची मागणी केली आहे. काही दिवसांनी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.