चना मसाला, नान, चहा अन्.....", भारतीय पदार्थांबाबत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष म्हणाल्या की....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 03:20 PM2020-10-17T15:20:06+5:302020-10-17T15:42:18+5:30

काश्मिर ते कन्याकुमारीपासून वेगवेगळ्या संस्कृतींचे प्रतिबंब हे अन्नपदार्थांमध्ये दिसून येते.

President tsai ing wen loved indian food share indian thaali photo on social media | चना मसाला, नान, चहा अन्.....", भारतीय पदार्थांबाबत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष म्हणाल्या की....

चना मसाला, नान, चहा अन्.....", भारतीय पदार्थांबाबत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष म्हणाल्या की....

Next

भारतीय अन्नपदार्थ फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये आवडीने खाल्ले जातात. भारतीय अन्नपदार्थांचे चाहते जगभरात मोठ्या संख्येने आहेत. कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, भारतात अन्नपदार्थांमध्ये विविधता आढळून येते. काश्मिर ते कन्याकुमारीपासून वेगवेगळ्या संस्कृतींचे प्रतिबंब हे अन्नपदार्थांमध्ये दिसून येते. दरम्यान लॉकडाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनंतर आता तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनीदेखील भारतीय जेवणाबाबतचं आपलं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साइ इंग-वेन (Tsai Ing-wen)  या भारतीय अन्नपदार्थांच्या चाहत्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत माहिती देत भारतीय पदार्थांबाबतचे प्रेम व्यक्त केलं आहे. गुरुवारी त्यांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी भारतीय थाळीचा फोटो शेअर केला होता. या थाळीत भात, नान, सलाड, डाळ, चना मसाला हे पदार्थ  दिसत आहे. भारतीय थाळीच्या फोटोसह साइ इंग-वेन यांनी ट्वीट केलं होतं की, तैवानमध्ये खूप भारतीय रेस्टॉरंट आहेत यासाठी तैवान भाग्यवान आहे.

''तैवानच्या लोकांना भारतीय पदार्थ खूप आवडतात. मला चना मसाला  खायला खूप आवडतं आणि चहा तर मला माझ्या भारत दौऱ्याची आठवण करून देतो. विविधतेने नटलेल्या आणि रंगबेरंगी भारताशी संबंधित आठवणी ताज्या होतात.'' असं त्यांनी सांगितलं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी इतरांनाही कोणते भारतीय पदार्थ आवडतात याबाबत विचारणा केली आहे.  Video: फॅशन डिजायनिंगच्या विद्यार्थ्यांचा PPE किट गरबा, गरबाप्रेमींनी लावली भन्नाट आयडिया

मे महिन्यातदेखील ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या घरी समोसा बनवला होता. या फोटोसह  त्यांनी ट्विट केलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं होतं. मोदींनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. समोसे खूपचं चविष्ट दिसत आहेत, कोरोनाची माहामारी  संपल्यानंतर आपण एकत्र बसून समोसे खाऊ असं त्यांनी यावेळी सांगितले.  देवमासा ठरला देवदूत! Whale ने केली उलटी अन् 'तो' करोडपती झाला ना राव....

Web Title: President tsai ing wen loved indian food share indian thaali photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.