Job: सरकारी की खासगी नोकरी चांगली? IPS अधिकाऱ्याने दिले 'हे' उत्तर, नेटकऱ्यांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 05:32 PM2023-03-05T17:32:03+5:302023-03-05T17:35:49+5:30

Private Job VS Government Job: अनेकजण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कष्ट करतात. सरकारी नोकरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, प्रयत्न करुन काहींना यात यश येते काहींना अपयश येते.

private job or government job ips dipanshu kabra reply wins heart on social media | Job: सरकारी की खासगी नोकरी चांगली? IPS अधिकाऱ्याने दिले 'हे' उत्तर, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Job: सरकारी की खासगी नोकरी चांगली? IPS अधिकाऱ्याने दिले 'हे' उत्तर, नेटकऱ्यांनी केले कौतुक

googlenewsNext

Private Job VS Government Job:  अनेकजण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कष्ट करतात. सरकारी नोकरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, प्रयत्न करुन काहींना यात यश येते काहींना अपयश येते. अपयश आलेली खासगी कंपनीत काम करतात, तर काहीजण स्वत:च व्यवसाय सुरू करतात. सरकारी नोकरी चांगली की खासगी नोकरी या संदर्भात एका आयपीएस अधिकाऱ्याचे ट्विट व्हायरल झाले आहे.  

सध्या सोशल मीडियावर एका आयपीएसचे ट्विट प्रचंड व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर सरकारी नोकऱ्या आणि खासगी नोकऱ्यांचा वाद पुन्हा पेटला आहे.दररोज सरकारी आणि खासगी नोकऱ्यांबद्दल चर्चा होते, कोणती चांगली आहे. या चर्चेवर उत्तर देताना आयपीएस अधिकाऱ्याने भन्नाट उत्तर दिले आहे.या उत्तराचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. नेटकरी त्यांचे ट्विटही शेअर करत आहेत.

काही दिवसापूर्वी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी दीपांशू काबरा यांनी एका मुलीची गोष्ट शेअर केली होती. यामध्ये ती नोकरी करत असताना शिकत होती.'आग कुठेही असू शकते, पण आग पेटली पाहिजे. रायपूरमधील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या करीनाला भेटा. ग्राहकांच्या येण्या-जाण्याच्या मधल्या काळात, तिला मिळणाऱ्या कमी वेळात ती अभ्यास करत आहे. वेळ मिळत नसल्याची सबब सांगणाऱ्यांनी प्रत्येक मिनिटाचा असा वापर करता येतो हे शिका' असं त्यांनी यात लिहिले होते. (Private Job VS Government Job:)

अजून किती भरणार! बसमध्ये ५५ ची क्षमता, भरले तब्बल १८० प्रवासी; मोजताना अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे

त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या, एका यूजरने काही वेगळेच ट्विट केले होते. सेवकराम नावाच्या युजरने रिप्लायमध्ये लिहिले की, खासगी मॅनेजरच्या नोकरीपेक्षा सरकारी शिपाई बनून समाजाच्या डोळ्यात चमकणारा हिरा बनणे चांगले आहे. युजरच्या या कमेंटला दीपांशु काबरा यांनी पुन्हा उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, माझ्या दृष्टीने मित्र दोघेही खूप आदरणीय आहेत. तुम्हाला जे व्हायचे आहे ते तुम्ही निवडू शकता, फक्त छान व्हा.'

यानंतर त्यांचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले. आयपीएस काबरा सध्या छत्तीसगडमध्ये परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. खासगी सरकारी दोन्ही नोकऱ्या सन्माननीय आहेत असंही पुढे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: private job or government job ips dipanshu kabra reply wins heart on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.