खेळासोबतच आपल्या सुंदरतेसाठीही चर्चेत असते ही भारतीय गोल्फर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 02:14 PM2018-08-30T14:14:23+5:302018-08-30T14:19:12+5:30
सोशल मीडिया असो वा मीडिया सगळीकडे जरी क्रिकेट खेळाडूंची चर्चा होत असली तरी असेही काही खेळ आहेत ज्यात भारतीय खेळाडूंनी आपली ओळख निर्माण केली आहे.
(Image Credit : flickr.com)
सोशल मीडिया असो वा मीडिया सगळीकडे जरी क्रिकेट खेळाडूंची चर्चा होत असली तरी असेही काही खेळ आहेत ज्यात भारतीय खेळाडूंनी आपली ओळख निर्माण केली आहे. या खेळाडूंची पारंपारिक माध्यमांनी दखल घेतली नसली तरी त्यांचं सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून कौतुक केलं जात. अशीच एक भारतीय गोल्फर आहे तिने आपली आवड जोपासत गोल्फमध्ये केवळ नावच कमावलं नाही तर फिटनेसमुळेही ती चर्चेत असते. तिच्या खेळासोबतच तिच्या सुंदरतेचेही लाखों चाहते आहेत.
शर्मिला निकोलेट असे या भारतीय गोल्फरचं नाव असून तिला इंटरनेट सेंसेशन असंही म्हटलं जातं.
शर्मिला यूरोपियन टूरमध्ये पूर्ण कार्ड मिळवणारी दुसरी भारतीय गोल्फर आहे. बंगळुरुमध्ये लहानाची मोठी झालेली शर्मिला केवळ १८ वर्षांची असतानाच प्रोफेशनल गोल्फर झाली. शर्मिलाचे वडील मार्क निकोलेट हे फ्रेन्च आहेत आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. तर आई सुरेखा भारतीय आहे.
शर्मिला खेळासोबतच फिटनेसबाबत वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये बोलते आणि जागरुकता करण्याचं काम करते.
शर्मिलाने सर्वात कमी वयाक यूरोपियन टूरसाठी क्वालिफाय केलं. सतत आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने एकूण ११ टायटल आपल्या नावावर केले आहेत. गोल्फ व्यतिरिक्त शर्मिलाने स्वीमिंगमध्ये अनेक किताब मिळवले आहेत. शर्मिला या यशाचं श्रेय योगाभ्यासाला देते.
शर्मिला २०१२ मध्ये हिरो-केजीए टूर्नामेंट आणि २०१५ मध्ये हिरो-डब्ल्यूपीजीटी यातही यश मिळवलं आहे.
सोशल मीडियात शर्मिलाची फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १२२ हजार फॉलोअर्स आहेत.
शर्मिलाला सोशल मीडियावर सर्वात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये गणलं जातं.