त्याने परिक्षेच्या पेपरात लिहिल्या PUBG खेळण्याच्या ट्रिक्स; मग काय रिझल्ट होता फिक्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:41 PM2019-03-23T13:41:59+5:302019-03-23T13:46:27+5:30
सध्या देशामधील तरूणांमध्ये पबजीची वाढती क्रेझ दिसून येत आहे. अशातच एका इव्हेंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, माझा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यावर उपाय म्हणून मी काय करू?
सध्या देशामधील तरूणांमध्ये पबजीची वाढती क्रेझ दिसून येत आहे. अशातच एका इव्हेंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, माझा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यावर उपाय म्हणून मी काय करू? यावर मोदींनी अगदी सहज विचारलं की, 'ये PUBG वाला है क्या?.... कार्यक्रमाचं संपूर्ण सभागृह खळखळून हसलं होतं. परंतु सध्या प्रकरण थोडंसं वेगळं असून विचार करायला भाग पाडणारं आहे. कारण काही दिवसांपासून या गेमबाबत अनेक नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत आहेत.
एका विद्यार्थ्याने केलेला प्रताप पाहून तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल. कर्नाटकमधील फर्स्ट इयरच्या एका विद्यार्थ्याने प्री-यूनिवर्सिटी परिक्षेमध्ये अर्थशास्त्राच्या पेपरच्या उत्तरपत्रिकेमध्ये PUBG गेम कसा खेळावा याबाबत लिहिलं असून शिक्षकांनी त्याच्या या उत्तराला एकही मार्क दिला नाही. परिणामी तो परिक्षेत नापास झाला आहे.
अतिशय हुशार होता हा विद्यार्थी
रिपोर्टनुसार, परिक्षमध्ये PUBG बाबत लिहणारा विद्यार्थी अभ्यासात खूप चांगला होता. त्याला 10 वीमध्ये डिस्टिंक्शन होतं. त्यानंतर त्याला मोबाईल दिला होता. ज्यानंतर त्याला मोबाईल देण्यात आला होता. परंतु मोबाईल मिळाल्यानंतर हा विद्यार्थी PUBG चा शिकार झाला.
काय लिहिलं उत्तरपत्रिकेमध्ये?
विद्यार्थ्याने PUBG गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करण्यापासून ते गेममधील बारकावेही पेपरमध्ये लिहिले आहेत. त्यामध्ये गेममधील ब्लाइंड स्पॉटपासून कसा बचाव करावा आणि ब्लाइंड स्पॉटमार्फत बेटर अटॅक कसा करता येतो, याबाबत सर्व लिहिलं आहे. विद्यार्थ्याने लिहिलेलं हे उत्तर वाचून शिक्षकही हैराण झाले आहेत.
विद्यार्थ्याची काउंसिलिंग सुरू
विद्यार्थाने केलेला हा प्रताप समोर येताच, कुटुंबियांनी त्याची काउंसिलिंग सुरू केली आहे. मागच्या वर्षी उत्तम गुणांनी पास झालेला हा विद्यार्थी यावर्षी मात्र PUBGच्या व्यसनामुळे अजिबात अभ्यास करू शकता नाही. तसं पाहायला गेलं तर या दिवसांमध्ये पबजीचं वेड मुलांना मानसिकदृष्ट्या कमजोर करत आहे. काही दिवसांपूर्वीच हा गेम खेळत असलेल्या मुलांचा ट्रेन अॅक्सिडंटमध्ये मृत्यू झाला. तसेच गुजरामधील काही जिल्ह्यांमध्ये पबजी बॅन करण्यात आलेलं आहे.