शेतात बहरलं विठुरायाचं सुंदर रुप! शेतकऱ्याने भात शेतीत साकारली विठुरायाची १२० फूट प्रतिकृती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 03:02 PM2024-07-17T15:02:21+5:302024-07-17T15:07:49+5:30

सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका विठ्ठल भक्ताचा व्हिडिओ समोर आला आहे. या शेतकऱ्याने केलेल्या कृतीचं सर्वांनीच तोंड भरून कौतुक केलं आहे. 

pune mulshi engineer creates on the occasion of ashadhi ekadashi made 120 feet lord vitthal paddy in field video goes viral | शेतात बहरलं विठुरायाचं सुंदर रुप! शेतकऱ्याने भात शेतीत साकारली विठुरायाची १२० फूट प्रतिकृती 

शेतात बहरलं विठुरायाचं सुंदर रुप! शेतकऱ्याने भात शेतीत साकारली विठुरायाची १२० फूट प्रतिकृती 

Social Viral : 'चंद्रभागे स्नान! तुका मागे हैची दान!! पंढरीचा वारकरी! वारी चुकों नेदी हरी!! संत तुकाराम महाराजांनी या अभंगात वारीचं महत्व पटवून दिलं आहे. मराठी मनाला आस लावणारी पंढरीची वारी ही वारकऱ्यांसाठी आणि मराठी माणसासाठी खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. पंढरीची वारी मराठी माणसाचा सांस्कृतिक स्वाभिमान आहे. आज आषाढी एकादशीच्या पर्वावर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातून येणाऱ्या वैष्णावांचा मेळा पंढरपुरला भरतो. लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्या भाविकांना विठुरायाचं दर्शन लाभतं ते भाग्यवानच! पण ज्यांना पंढरपूर गाठता येत नाही त्यांनी काय करावं बरं? पुण्यातील एका इंजिनिअरने यावर मार्ग काढला. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका विठ्ठल भक्ताचा व्हिडिओ समोर आला आहे. या शेतकऱ्याने केलेल्या कृतीचं सर्वांनीच तोंड भरून कौतुक केलं आहे. 

आषाढी एकादशीनिमित्त पुण्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क विठुरायाची प्रतिकृती बनवली आहे. पुण्याच्या मुळशी गावातील या शेतकऱ्याने आपल्या शेतात भात रोपाच्या साहाय्याने  १२० फूट उंच विठ्ठलाची प्रतिकृती साकारल्याचं पाहायला मिळत आहे. पेश्याने इंजिनिअर असणाऱ्या शेतकऱ्याची कलाकृती नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये या शेतकऱ्यासह गावातील काही ग्रामस्थ विठुरायाचं दर्शन घेताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये भातरुपी विठ्ठलाची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ जुना असल्याची माहिती मिळत आहे.

All India Radia News च्या एक्स प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. भातशेतीच्या रोपापासून विठ्ठलाचं देखणं रूप साकारून मुळशीच्या या शेतकऱ्याने नेटकऱ्याचं लक्ष वेधलं आहे. व्हिडिओवर "जय श्री विठ्ठल जय हरि विठ्ठल" अशी कमेंट एक यूजरने केली आहे तर आणखी एकाने  "राम कृष्ण हरी" म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Web Title: pune mulshi engineer creates on the occasion of ashadhi ekadashi made 120 feet lord vitthal paddy in field video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.