Video - 2 रुपये किलोने गहू घेण्यासाठी मर्सिडीजने आला 'तो'; रेशन दुकानातून घेतलं 4 पोती धान्य अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 09:22 AM2022-09-07T09:22:29+5:302022-09-07T09:32:18+5:30
मर्सिडीजमधून आलेली एक व्यक्ती रेशन दुकानात गेली. त्याने दुकानदाराला रेशनकार्ड दाखवून तिथून चार पोती धान्य घेतलं. ते कारच्या डिक्कीत टाकलं आणि निघून गेली.
पंजाबच्या होशियारपूरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका रेशन दुकानासमोर एक आलिशान गाडी येऊन उभी राहिली आणि मर्सिडीजमधून आलेली एक व्यक्ती रेशन दुकानात गेली. त्याने दुकानदाराला रेशनकार्ड दाखवून तिथून चार पोती धान्य घेतलं. ते कारच्या डिक्कीत टाकलं आणि निघून गेली. दोन रुपये किलोने गहू घेऊन जाण्यासाठी मर्सिडीजमधून आलेल्या व्यक्तीची सध्या सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे या रेशन घेण्यासाठी आलेल्या या मर्सिडीजचा नंबर देखील व्हिआयपी होता. मर्सिडीजमधून येऊन रेशन दुकानातून धान्य देणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ तिथेच असलेल्या एकाने मोबाईलवर काढला. रेशन दुकानदार अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रेशन कार्ड तयार करण्याचं काम धान्य पुरवठा विभाग करतो. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, त्यांना धान्य द्या, अशा सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे आम्ही फक्त धान्य वाटपाचं काम करतो. त्यांच्याकडे असलेलं रेशन कार्ड कशी आणि कुठून आलं, याची आम्हाला माहिती नसते."
पंजाब की राशन व्यवस्था
— हम लोग We The People (@ajaychauhan41) September 6, 2022
लोग मर्सिडीज में आकर सरकारी दुकान से राशन लेकर जाते हैं
और जो असली हकदार है उसे नहीं मिलता pic.twitter.com/7wXHWNe5Gx
मर्सिडीजमधून धान्य देणाऱ्या व्यक्तीचं नाव सुमित सैनी आहे. त्यांना याबद्दल विचारलं असता, व्हिडीओमध्ये दिसणारी कार आपल्या नातेवाईकांची आहे. ते परदेशात असतात. त्यांची कार माझ्याच घराजवळ असते. कार डिझेलवर चालणारी असल्यानं कधीतरी चालवून आणतो, असं सैनी यांनी म्हटलं आहे. धान्याची पोती मर्सिडीजमधून घेऊन जातानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.