माणुसकीचं दर्शन! विजेचा शॉक लागण्यापासून गायीचा वाचवला जीव; Video नं जिंकली अनेकांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 04:21 PM2022-07-05T16:21:41+5:302022-07-05T16:22:32+5:30
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातून माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. मानसा जिल्ह्यातील एका व्यक्तीने गायीला विजेचा शॉक लागण्यापासून वाचवले आहे.
मानसा-
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातून माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. मानसा जिल्ह्यातील एका व्यक्तीने गायीला विजेचा शॉक लागण्यापासून वाचवले आहे. दरम्यान या बचावाचा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गायीचे प्राण वाचवत असलेल्या व्यक्तीचे नेटकऱ्यांनी खूप कौतुक केले आहे. "मोठे धाडस दाखवून गायीचे प्राण याने वाचवले आहेत", अशा भावना नेटिझन्सने व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे, एक गाय पाणी साचलेल्या भागात विजेच्या खांबाजवळ उभी होती. गाईचा भिजलेल्या खांबाला स्पर्श होताच विजेचा झटका लागला आणि ती तडफडू लागली. गायीची तडफड पाहून तिथे असलेल्या माणसाने स्वत:चा जीव धोक्यात घालून गायीकडे धाव घेतली.
Not all heroes wear capes...
— Righty nor Lefty (@akhilnaithani) July 3, 2022
In Mansa, a cow got electrocuted near an electric pole and started suffering. A nearby shopkeeper dragged the cow with a cloth which saved the life of the cow. #Heroes#TheBoys#indiapic.twitter.com/vLep9VJyXZ
विजेचा शॉक लागताच गायीला वेदना होऊ लागल्या आणि ती जमिनीवर कोसळली. तेवढ्यात शेजारील दुकानातून दुकानदार बाहेर आला गायीच्या पायाला कापड बांधून विजेच्या खांबापासून दूर खेचले. या बचावकार्यात दुकानदाराची आणखी एका व्यक्तीने मदत केली. नंतर गाय काही कालावधीनंतर सुरक्षितपणे बाहेर निघाली आणि रस्ता ओलांडू लागली. गायीचे प्राण वाचवण्याच्या धाडसी कृतीबद्दल नेटकऱ्यांनी त्या माणसाचे कौतुक केले आहे.
नेटकऱ्यांनी केले कौतुक
दुकानदाराने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करताना एका युजरने म्हटले की, माणुसकीचा खरा अर्थ हाच आहे. त्या व्यक्तीने धाडस दाखवून विजेचा शॉक लागलेल्या गायीचा जीव वाचवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.