VIDEO: जो नडला, त्याला केला आडवा; घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:04 PM2020-03-24T13:04:09+5:302020-03-24T13:10:49+5:30

सरकार आणि डॉक्टर लोकांना ओरडून ओरडून काळजी घेण्याच्या आणि घरातच राहण्याच्या सूचना करत आहे. पण या गोष्टींना अजिबात गंभीरतेने घेतलेलं नाही. त्याचाच हा परिणाम म्हणता येईल.

Punjab police when you will not maintain social distancing watch video api | VIDEO: जो नडला, त्याला केला आडवा; घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

VIDEO: जो नडला, त्याला केला आडवा; घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

Next

कोरोना व्हायरस झपाट्याने अनेकांना शिकार करत आहे. अशात देशातील सरकार या व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळे उपाय सांगत आहेत. पण काही लोकांनी या गोष्टींना अजिबात गंभीरतेने घेतलेलं नाही. आतापर्यंत जगभरात 16 हजार 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर 3 लाख 81 हजारपेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली आहे. दरम्यान गेल्या रविवारी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. 

लोकांना असं करून सोशल डिस्टेंस आणि लॉकडाउनची सूचना देण्यात आली होती. पण तरीही लोक बाहेर पडत आहेत. अशांना पोलीस कशाप्रकारे घरी राहण्याचं शिकवत आहेत हे बघायला मिळत आहे.

असाच एक व्हिडीओ आयपीएस पंकज नॅन यांनी 23 मार्चला ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, 'जर तुम्ही सोशल डिस्टेंस ठेवणार नाही तर पंजाब पोलीस तुमच्यासोबत असं करेल. कृपया स्वत:ला आणि दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा. हात जोडून विनंती करतो की, हा पिकनिकचा वेळ नाहीये'.

कर्फ्यू असताना हे लोक बाइक घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांना पोलिसांनी असा नियम तोडण्याचा धडा शिकवला.  तुम्हीही असं केलं तर तुम्हालाही फटके पडल्याशिवाय राहणार नाही.


Web Title: Punjab police when you will not maintain social distancing watch video api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.