बिबट्याने केला अजगरावर हल्ला, शिकार होणार इतक्यात अजगराने बिबट्यावरच केला हल्ला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 02:04 PM2022-02-21T14:04:09+5:302022-02-21T21:35:41+5:30
एक बिबट्या अजगरावर हल्ला करताना दिसतो (Leopard Attacks on Python). हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
सिंह, बिबट्या आणि साप अनेकदा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आपली भूक भागवण्याकरता इतर प्राण्यांची शिकार करतात (Wild Animals) . यात बिबट्याबद्दल जर बोलायचं झालं तर या प्राण्याला आदिवासी शिकारी म्हणून ओळखलं जातं. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो.
मात्र, कदाचितच तुम्ही असं कधी पाहिलं असेल की एखादा बिबट्या सापासोबतच भिडला. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक बिबट्या अजगरावर हल्ला करताना दिसतो (Leopard Attacks on Python). हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
असं म्हटलं जातं की बिबट्या एक असा शिकारी आहे, जो अतिशय चपळपणे आणि समजदारीने आपली शिकारी करतो. तर दुसरीकडे दुसरीकडे अजगरानेही एकदा आपल्या शिकारीवर हल्ला केला तर समोरच्या प्राण्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. अशात तुम्ही याचा अंदाज लावू शकता का की या भयंकर लढाईत कोणाचा विजय होईल आणि कोणाची हार?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर येतो. तिथे त्याची नजर एका छोट्या अजगरावर पडते. अशात बिबट्या संधी मिळताच लगेचच अजगरावर हल्ला करतो आणि त्याला आपल्या जबड्यात पकडतो. यादरम्यान अजगरही त्याच्यावर हल्ला करतो मात्र बिबट्या या परिस्थिती योग्य प्रकारे हाताळतो आणि अजगराची शिकार करतो.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर wild_animals_creation नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहिल्यावर समजलं की का याला जंगलातील सर्वात घातक शिकारी म्हटलं जातं. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, जंगलात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. अजगर विषारी नसतात मात्र ते आपल्या शिकाऱ्याला सहज सोडतही नाहीत. अजगराच्या तावडीत कोणी सापडलं तर जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत अजगर त्याचा गळा आवळतं. अजगर बिबट्यासाठीही घातक असतो. मात्र या व्हिडिओमध्ये बिबट्याने अजगरासोबतची लढाई जिंकून त्याचा जीवही घेतला.