Viral Video: ट्रायल रुमध्ये शिरला अजगर, रेस्क्यु टीमवरच केला हल्ला अन् मग झालं होत्याचं नव्हतं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 01:15 PM2022-02-16T13:15:12+5:302022-02-16T13:24:36+5:30

एका स्टोरमध्ये एक अजगर ट्रायल रूमचं छत तोडून आतमध्ये शिरल्यानंतर एकच गोंधळ उडाला हा अजगर तिथे कसा पोहोचला, हे माहिती नाही. मात्र, तो ट्रायल रूममधून बाहेर पडायला तयार नव्हता. रेस्क्यूसाठी आलेल्या टीमवरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

python in the roof of trail room of the store video goes viral on social media | Viral Video: ट्रायल रुमध्ये शिरला अजगर, रेस्क्यु टीमवरच केला हल्ला अन् मग झालं होत्याचं नव्हतं

Viral Video: ट्रायल रुमध्ये शिरला अजगर, रेस्क्यु टीमवरच केला हल्ला अन् मग झालं होत्याचं नव्हतं

googlenewsNext

कपडे खरेदी करण्यासाठी आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो, तेव्हा कपडे घेण्याआधी ते ट्राय करून बघतो. हे कपडे आपल्याला व्यवस्थित बसल्यावर आणि आपल्यावर चांगले दिसल्यावरच आपण खरेदी करतो. मात्र, एका स्टोरमध्ये एक अजगर ट्रायल रूमचं छत तोडून आतमध्ये शिरल्यानंतर एकच गोंधळ उडाला हा अजगर तिथे कसा पोहोचला, हे माहिती नाही. मात्र, तो ट्रायल रूममधून बाहेर पडायला तयार नव्हता. रेस्क्यूसाठी आलेल्या टीमवरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला (Python Shocking Video).

या अजगराला जेव्हा जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तो भडकला. आधी तर ज्या बिळात तो जाऊन बसला होता, तिथून त्याला बाहेर काढणंच मोठं आवाहन होतं. नंतर अजगर रेस्क्यूसाठी आलेल्या व्यक्तीवरच हल्ला करू लागला. (Python in Roof of Changing Room).

कपड्यांच्या मधून जात तो छताच्या आतमध्ये कधी शिरला (Python sneaked inside roof) हे समजलंही नाही. यानंतर वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली. काही वेळातच रेस्क्यू टीम तिथे पोहोचली. यावेळी हा अजगर छताच्या फॉल सिलिंगमध्ये बसलेला होता. हे तोडताच अजगर डोळ्यांसमोर दिसू लागला. तो इतका भडकलेला दिसत होता, जणू समोर कोणी येताच एखाद्याला कच्चं खाईल.

फॉल सिलिंगमधून खाली लटकलेला हा अजगर अतिशय भयानक रूपात दिसत होता. तो वारंवार आपलं तोंड उघडून रेस्क्यू टीमच्या सदस्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. रेस्क्यू टीमने त्याला खाली पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र खाली पडताच अजगर आणखीच आक्रमक झाला.

बराच वेळ अथक प्रयत्न केल्यानंतर अजगराला पकडण्यात रेस्क्यू टीमला यश आलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी रेस्क्यूच्या या पद्धतीबाबत सवाल उपस्थित केले आहेत. स्नेक हुक न वापरल्यामुळे अनेकांनी हा व्यक्ती हिरोपंती दाखवत असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: python in the roof of trail room of the store video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.