Video : बापरे! गाडीच्या चाकामध्ये अकडला १४ फुट लांब अजगर; पाहा 'कसा' बाहेर काढला
By manali.bagul | Published: September 23, 2020 02:03 PM2020-09-23T14:03:22+5:302020-09-23T14:09:14+5:30
गाडीच्या चाकांमध्ये हा १४ फुट लांब अजगर अडकला आहे.
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका अजगराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एका घरात अजगर शिरल्यानं तिथं उपस्थित असलेल्या माणसांनी बंदुकीने गोळी मारून अजगराला मारून टाकलं. त्यानंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात होती. माणुसकी शिल्लक नसल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. सध्या पुन्हा एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. गाडीच्या चाकांमध्ये हा १४ फुट लांब अजगर अडकला आहे.
In monsoon snakes can sneak into vehicles. Just be little careful. pic.twitter.com/C6mzWkZSLH
— Susanta Nanda IFS (@susantananda3) September 22, 2020
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता अत्यंत प्रेमानं हा अजगर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला माणुसकीचं दर्शन नक्कीच घडेल. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पावसाळ्यात अनेकदा साप गाडीच्या चाकात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी असं कॅप्शन दिलं आहे. १५ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, जर साप किंवा अजगर गाडीच्या चाकात अडकला तर आधी चाक खोलून मग बाहेर काढलं जातं. हा अजगर खूप मोठा असल्यामुळे सहजासहजी बाहेर निघणं कठीण होतं. तरिही अत्यंत हुशारीनं त्यांनी या अजगराला काढलं आहे. नंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अजगराच्या अंगावर पाणी टाकलं आहे. अनेकांना या व्हिडीओला पसंती दिली आहे. कारण अजगराला कोणताही धोका न पोहोचवता सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.
हे पण वाचा-
Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'
काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ
शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा
बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...