काय सांगता? चक्क भिंतीतून येतेय दारू; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:51 PM2021-05-28T12:51:36+5:302021-05-28T12:51:55+5:30

लॉकडाऊन असूनही दारुची सर्रास वि्क्री; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

raebareli video viral of liquor selling illegally through walls | काय सांगता? चक्क भिंतीतून येतेय दारू; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

काय सांगता? चक्क भिंतीतून येतेय दारू; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

Next

रायबरेली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनचे नियम मोडले जात आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेलीत असाच एक प्रकार घडला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महराजगंज रोडवरील एका दुकानातून गुपचूप दारू विकली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

बीयर विक्री करणाऱ्या दुकानाचा मुख्य दरवाजा बंद ठेवून भिंतीमधून दारूच्या बाटल्या विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांकडून अधिक रक्कम घेतली जात आहे. ग्राहकांना दारू पुरवण्यासाठी भिंतीत होल तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून संध्याकाळी ७ नंतरही सर्रासपणे दारूची विक्री केली जाते. विदेशी मद्यासाठी २० ते १०० रुपये अधिक आकारले जात आहेत. तर बीयरच्या एका कॅन आणि बाटलीमागे २० ते ५० रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत. 



महामार्गांच्या शेजारी असलेल्या दारुच्या दुकानांमधून सर्रासपणे कायद्यांचं उल्लंघन सुरू आहे. या भागात गस्त घालणारे पोलीसदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पोलिसांकडे संशयानं पाहिलं जात आहे. मागच्या बाजूनं दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांनी याची माहिती तळीरामांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी काही विशेष व्यक्तींवर सोपवली आहे. या व्यक्ती दुकानाच्या परिसरात उपस्थित असतात आणि तळीरामांना दुकानातून मागून दारू विकली जात असल्याची माहिती पुरवतात.

Web Title: raebareli video viral of liquor selling illegally through walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.