वडील रेल्वेत गार्ड तर मुलगा टीटी; बाप-लेकाचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 03:09 PM2022-06-17T15:09:49+5:302022-06-17T15:10:50+5:30
Indian Railways: सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आता एका बाप-लेकाचा फोटो व्हायरल होत आहे.
Indian Railways: सोशल मीडियावर दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असता. असाच एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोन पिढ्या एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. या फोटोला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत असून, अनेकजण फोटोवर कमेंट आणि शेअरदेखील करत आहेत.
वडील गार्ड तर मुलगा टीटीई
सध्या व्हायरल होत असलेला फोटो एका बाप-लेकाचा आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? तर या फोटोतील विशेषता म्हणजे, मुलगा रेल्वेमध्ये तिकीट चेकर(TTE) आणि वडील रेल्वेतच गार्ड आहेत. ते दोघे वेगवेगळ्या ट्रेनमध्ये ड्युटी करत होते, यादरम्यान दोघांच्या ट्रेन एका क्रॉसिंग पॉइंटवर एकत्र आल्या. यावेळी मुलाने वडिलांसोबत सेल्फी घेतला. या बाप-लेकाचा सेल्फी सध्या व्हायरल होत आहे.
अजब ग़ज़ब सेल्फ़ी
— Suresh Kumar (@Suresh__dhaka29) June 15, 2022
पिता रेलवे में गार्ड है और बेटा टीटी है । जब दोनो की ट्रेन अगल-बग़ल से गुजरी तो एक सेल्फ़ी का लम्हा बन गया ❤️ pic.twitter.com/Zd2lGHn7z3
ट्विटरवर हा फोटो व्हायरल होत आहे
या फोटोमध्ये वडील आणि मुलगा आपल्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत. ट्विटर युझर सुरेश कुमार यांनी हा फोटो ट्विट करून लिहिले, 'अमेझिंग सेल्फी. वडील रेल्वेत गार्ड तर मुलगा टीटीई आहे. दोन गाड्या एकत्र आल्यावर सेल्फी काढला. ट्विटमध्ये दोन्ही गाड्यांचे नाव नमूद केलेले नाही. पण, प्लॅटफॉर्म दिसत आहे. या पोस्टला 28,000 हून अधिक लाईक्स आणि 1,700 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.