#Deepveer च्या लग्नाच्या फोटोंचा नाद सोडा, राजस्थान पोलिसांचं ट्विट बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 01:27 PM2018-11-16T13:27:15+5:302018-11-16T13:27:51+5:30
एकदाचं अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचं लग्न झालं. या दोघांचे लग्नाचे फोटो बघण्यासाठी त्यांचे चाहते वेडे-पिसे झाले होते.
एकदाचं अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचं लग्न झालं. या दोघांचे लग्नाचे फोटो बघण्यासाठी त्यांचे चाहते वेडे-पिसे झाले होते. अखेर या नव्या जोडप्याचे काही फोटो समोर आले आणि सोशल मीडियात या फोटोंचा महापूर आला. एकीकडे हे फोटो शेअर होत असताना राजस्थान पोलिसांचं एक ट्विट चांगलंच लक्ष वेधून घेणारं ठरत आहे. हा फोटो रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या फोटोंपेक्षाही खूप पुढचा विषय ठरला आहे.
राजस्थान पोलिसांनी दीपिकाचा फोटो फारच वेगळ्या कामासाठी वापरला आहे. राजस्थान पोलिसांनी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक भलतीच आयडियाची कल्पना शोधून काढली आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून एक चिमुट कुंकू आणि मतदान यांचं महत्त्व पटवून सांगितलं आहे.
याद है #OmShantiOm का वो एक चुटकी वाला dialogue?
— Rajasthan Police (@PoliceRajasthan) November 15, 2018
एक चुटकी सिन्दूर की कीमत रमेश बाबू जाने या न जाने पर हमारे voters जानते हैं की#Democracy की शान होता है 1 वोट#Voters का अधिकार होता है 1 वोट #7दिसंबर मतदान अवश्य करें#RajasthanElection2018#MeraVoteMeriSarkar@SpokespersonECIpic.twitter.com/kjxqs1t29W
येत्या ७ डिसेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. पण राजस्थान पोलिसांनी जी शक्कल लढवली आहे त्याचं चांगलंच कौतुक होत आहे. म्हणजे त्यांनी ट्रेंडिंग टॉपिक घेऊन मीम तयार केलं आणि लोकांमध्ये जनजागृती केली.