Raksha Bandhan Special : भावा-बहिणींसाठी खास रक्षाबंधनाचे सोशल व्हायरल मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:56 AM2018-08-25T11:56:12+5:302018-08-25T11:58:00+5:30
Raksha Bandhan Special: राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो.
रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावास राखी बांधून देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत आहे.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात.
नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ,
मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
हातातल्या राखीसोबतच
ताई तुझ प्रेम मनी मी साठवलंय
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती
रक्षावे मज सदैव, अन् अशीच फुलावी प्रीती
बंधन असूनही, बंधन हे थोडेच
या तर हळव्या रेशीमगाठी
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
काही नाती खूप अनमोल असतात
हातातील राखी मला याची कायम
आठवण करून देत राहील
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये
आणि आलच तर त्याला आधी
मला सामोरे जावे लागेल
राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा..