रानू मंडलने गायले 'मनिके मागे हिथे', सोशल मिडियावर तिच्या व्हिडिओचा धुमाकुळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 17:14 IST2021-09-30T15:28:03+5:302021-09-30T17:14:06+5:30
लाल रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातलेल्या रानूने मनिके मागे हिथे गायलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रानू मंडलने गायले 'मनिके मागे हिथे', सोशल मिडियावर तिच्या व्हिडिओचा धुमाकुळ
दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर रानू मंडळ (Ranu Mandal) दिसली. या दरम्यान ती लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे आयकॉनिक गाणं गात होती. या गाण्यामुळे ती सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती आणि रातोरात बरीच चर्चेतही आली.
त्यानंतर तिला मुंबईतील एका रिअॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं. शोमध्ये जज म्हणून उपस्थित झालेल्या हिमेश रेशमिया यांनी रानूच्या गायन कौशल्याचं कौतुक केलं आणि त्यांच्या हॅपी हार्डी आणि हीर या चित्रपटासाठी तिला गाण्याची विनंती केली.
YouTuber Rondhon Porichoy ने रानू मंडलचं ‘मनिके मागे हिथे’ गाण्याचा एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि क्लिपला आतापर्यंत ५४ हजारा हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लाल रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातलेल्या रानूने मणिके मागे हिथे गायलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सतीश रथनायकाचे २०२० चे मणिके मागे हिथे हे सिंहली गाणं आहे. श्रीलंकन गायक योहानी दिलोका दा सिल्वाची आवृत्तीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर हे गाणं व्हायरल झाले.