कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 03:33 PM2021-02-04T15:33:24+5:302021-02-04T15:43:37+5:30

सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या बिबट्याचे सौंदर्य पाहून अनेकजण चकीत झाले आहेत.

Rare black leopard spotted in maharashtra captured by wildlife photographer anurag gawande | कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो

कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो

googlenewsNext

वाईल्डलाईफ फोटोग्राफर अनुराग गवांडेने पुन्हा एकदा एका दुर्मिळ बिबट्याचा फोटो कॅमेरात कैद केला आहे.  विशेष हा दुर्मिळ काळ्या रंगाचा बिबिट्या महाराष्ट्रात आढळून आला आहे.  अनुरागने सोशल मीडियावर या बिबट्याचा फोटो शेअर करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या बिबट्याचे सौंदर्य पाहून अनेकजण चकीत झाले आहेत.

 

महाराष्ट्रातील ताडोबा नॅशनल पार्कमध्ये कैद करण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसार या बिबट्याचा फोटो अनुरागनं  जेव्हा हा फोटो काढला तेव्हा तो या बिबट्यापासून फक्त ३ फुटांच्या अंतरावर होता.  २ फेब्रुवारीला आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँण्डलवरून  हा फोटो शेअर करण्यात आला आहे. 'याच्या डोळ्यांमध्ये पाहा. या डोळ्यांमध्ये पाहून तुम्हाला भीतीचा अर्थ कळेल'. असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.

हा बिबट्या आपल्या काळ्या रंगामुळे दुर्मिळ समजला जातो. फोटोग्राफरनं माध्यमांशी बोलताना सांगितलं की जेव्हा त्यानं हा बिबट्याला पाहिलं तेव्हा तो एका  हरणाच्या शिकारीसाठी पळत होता.  जवळपास ११ टक्के बिबिटे मॅलेनिस्टीक रंगाचे असतात. त्यामुळे त्यांची त्वचा चमकदार दिसते. याशिवाय त्यांचा रंग त्वचेला  खास बनवतो. थरारक! बसनं मागून धडक देताच २ जण ट्रॅक्टरमधून खाली पडले; अन् मग घडलं असं काही; पाहा व्हिडीओ

२४ वर्षीय फोटोग्राफर अनुरागनं सांगितले की, ''बिबट्यानं हरणाला पाहिलं आणि त्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात मागे पळत गेला. बिबट्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.  त्यानंतर थकून रस्त्यावर येऊन १५ ते २० मिनिटं येऊन बसला.  यादरम्यान मी या  बिबट्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला.  या फोटोतून कळतं की हा ताडोबा राष्ट्रीय अभयारण्यातील  एकुतला एक काळा बिबट्या आहे. ''बापरे! १० वर्षांपासून दारू प्यायचा; घास गिळायला त्रास झाल्यानंतर एक्स रे पाहून डॉक्टर चक्रावले

Web Title: Rare black leopard spotted in maharashtra captured by wildlife photographer anurag gawande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.