Rare Melanistic Tiger: ओडिशा राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ काळ्या वाघाचे दर्शन, IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 03:32 PM2022-07-31T15:32:32+5:302022-07-31T15:37:26+5:30
Rare Tiger: ओडिशातील सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये हा दुर्मिळ वाघ दिसला असून, नेटकऱ्यांना वाघाचा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे.
Melanistic Tiger in Odisha: जगात वाघांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण, वाघांना वाचवण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्नही सुरू आहेत. अनेक देशांमध्ये हे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, ओडिशाच्या सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये एक दुर्मिळ वाघाचे दर्शन झाले आहे. IFS अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त ट्विटरवर या वाघाचा एक व्हडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
IFS ने शेअर केला व्हिडिओ
ट्विटरवर ही क्लिप शेअर करताना भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी लिहिले, "आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त दुर्मिळ काळ्या वाघाची एक मनोरंजक क्लिप शेअर करत आहे. काळ्या वाघांमध्ये एक अद्वितीय जीन पूल आहे आणि व्याघ्र प्रकल्प त्यांची संख्या सुधारण्यासाठी सज्ज आहे."
Tigers are symbol of sustainability of India’s forests…
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 29, 2022
Sharing an interesting clip of a rare melanistic tiger marking its territory on international Tigers day.
From a Tiger Reserve poised for recovery of an isolated source population with a very unique gene pool. Kudos🙏🙏 pic.twitter.com/FiCIuO8Qj4
व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती
सुशांत नंदा अनेकदा सोशल मीडियावर वन्यजीवांशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असतात. आता शेअर केलेला वाघाचा व्हिडिओ नेटकऱ्यांना हा प्रचंड आवडला असून, याला लाईक्स आणि अनेक शेअर मिळत आहेत. अनेकांनी वाघ पहिल्यांदाच पाहिला आहे. अधिकाऱ्याला अनेकजण या वाघाबद्दल अनेक प्रकारचे प्रश्नही विचारत आहेत.
काळे वाघ सिमिलीपालमध्ये आढळतात
काळे वाघ अतिशय दुर्मिळ असून, हे फक्त सिमिलीपालमध्येच आढळतात. मेलेनिस्टिक म्हणजेच, काळ्या वाघाच्या अंगावरील पट्टे अती गडद असल्याचे म्यूटेशन आहे. हे मूळात बंगाल टायगर आहेत, पण एका विशिष्ट जनुकांमध्ये बदल झाल्यामुळे, त्यांच्या अंगावरील पट्टे जास्त काळे झाले आहेत.