रतन टाटा यांनी शेअर केला पियानो वाजवतानाचा फोटो, फॅन्स म्हणाले - 'तुम्ही ऑलराउंडर आहात सर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:10 PM2021-09-08T18:10:08+5:302021-09-08T18:16:13+5:30

Ratan Tata : या फोटोत रतन टाटा हे पियानो वाजवताना दिसत आहेत. हा फोटो बघताच फॅन्स म्हणाले की, सर, तुम्ही तर ऑलराउंडर आहात.

Ratan Tata shares pic of himself playing piano on instagram post goes viral | रतन टाटा यांनी शेअर केला पियानो वाजवतानाचा फोटो, फॅन्स म्हणाले - 'तुम्ही ऑलराउंडर आहात सर...'

रतन टाटा यांनी शेअर केला पियानो वाजवतानाचा फोटो, फॅन्स म्हणाले - 'तुम्ही ऑलराउंडर आहात सर...'

Next

८३ वर्षीय रतन टाटा लाखो तरूणांसाठी प्रेरणा आहेत. ते जेव्हाही सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे फोटो किंवा आठवणी शेअर करतात तेव्हा ते व्हायरल होतात. नुकताच त्यांनी एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोत रतन टाटा (Ratan Tata) हे पियानो वाजवताना दिसत आहेत. हा फोटो बघताच फॅन्स म्हणाले की, सर, तुम्ही तर ऑलराउंडर आहात.

आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत रतन टाटा म्हणाले की, 'जेव्हा मी तरूण होतो तेव्हा मी थोडं पियानो वाजवणं शिकलो होतो. मी अजूनही विचार करतो की, आणखी चांगल्या प्रकारे वाजवणं शिकावं. आपल्या रिटायरमेंटनंतर मला एक चांगला पियानो टीचरही मिळाला. पण दोन्ही हातांनी वाजवण्यासाठी ज्याची गरज होती, ते त्यावर लक्ष देण्यात असमर्थ ठरले. असो, मला आशा आहे की, मी पुन्हा एकदा प्रयत्न करेल'.

लोक रतन टाटा यांचं भरभरून कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, तुम्ही लाखो लोकांची प्रेरणा आहात सर. तर एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही.

याआधी त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, 'जेआरडी यांच्या ११७व्या जयंतीनिमित्त आणखी एक यादगार फोटो, आणखी एक आठवण. श्री जेआरडी टाटा यांनी 'टाटा' कार बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. श्री सुमंत मूलगांवकर यांनी ते स्वप्न साकार केलं. सुमंत मूलगांवकर यांना टाटा मोटर्सचा वास्तुकार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी पुढे लिहिलं की, 'जे यांच्या अनेक स्वप्नातील एक स्वप्न सत्यात उतरलं.
 

Web Title: Ratan Tata shares pic of himself playing piano on instagram post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.