गोष्टीतल्या ससा-कासवाची प्रत्यक्षात लावली शर्यत, पाहा कोण जिंकलं ते?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 05:41 PM2022-01-03T17:41:07+5:302022-01-03T17:43:44+5:30
प्रत्यक्ष जर ससा आणि कासवाची धावण्याची स्पर्धा लावली (Tortoise And Rabbit race video) आणि कोण जिंकेल असं विचारलं तर साहजिकच आपल्या प्रत्येकाचं उत्तर असेल ससा. कारण ससा आणि कासवाचा वेग आपल्याल माहितीच आहे. पण जे आपल्याला गोष्टीतही अनपेक्षित होतं ते प्रत्यक्षात घडलं आहे.
आणि कासवाच्या शर्यतीची (Tortoise And Rabbit Story) गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. या गोष्टीचा शेवटही आपल्याला अनपेक्षित असा होता. प्रत्यक्ष जर ससा आणि कासवाची धावण्याची स्पर्धा लावली (Tortoise And Rabbit race video) आणि कोण जिंकेल असं विचारलं तर साहजिकच आपल्या प्रत्येकाचं उत्तर असेल ससा. कारण ससा आणि कासवाचा वेग आपल्याल माहितीच आहे. पण जे आपल्याला गोष्टीतही अनपेक्षित होतं ते प्रत्यक्षात घडलं आहे.
गोष्टीप्रमाणेच ससा आणि कासवाची खरी शर्यत लावण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. गोष्टीतील शर्यत प्रत्यक्षात पाहताना मजा तर येतेच. पण त्याचा शेवट पाहूनही आश्चर्यच वाटतं. व्हिडीओत पाहू शकता कासव आणि ससा यांना शर्यतीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. कासवाची मंद गती पाहता सुरुवातीला त्याला शर्यतीत सोडलं जातं. त्यानंतर वेगवान सशाला सोडलं जातं. शर्यतीच्या सुरुवातीला दोघांमध्ये काही अंतर दिसून येतं.
आता ससा तो ससा टुणटुण उड्या मारत तो कासवाच्या पुढे जातो. पण अगदी गोष्टीतल्या सशाप्रमाणेच कासवाच्या पुढे जाताच तो मध्येच थांबतो आणि कासवाकडे पाहत राहतो. कासव आपलं हळूहळू चालत राहतं. सशाकडे तर तो ढुंकूनही पाहत नाही. आपला शांतपणे आपल्या मार्गाने चालत राहतो. कासव सशाच्याही पुढे जातं. आता तरी ससा तिथून हलेल असं वाटतं. पण नाही ससा आपल्या तिथंच बसून राहतो.
“The hare and the tortoise” in fact pic.twitter.com/FYFx3OXJ1N
— The Entertainer.🧑🎤 (@haverkamp_wiebe) January 1, 2022
कासव हळूहळू चालत अगदी आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचतं. अखेर गोष्टीप्रमाणेच खऱ्या आयुष्यातील स्पर्धेतही कासवच ही शर्यत जिंकतो. @haverkamp_wiebe नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच लाइक्स आणि कमेंट येत आहेत. बहुतेकांना तर बालपणात वाचलेल्या ससा आणि कासवाची गोष्ट आठवली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. आतापर्यंत इतिहास पुन्हा घडतो असं फक्त वाचलं होतं पण आज या व्हिडीओच्या माध्यमातून ते खरं होत असल्याचंही पाहिलं, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.