पुण्यातल्या मराठमोळ्या सलोनीच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओमागची खरी गोष्ट समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 04:45 PM2020-07-19T16:45:04+5:302020-07-19T16:49:10+5:30

 कोरोनातून बरं होऊन आपले नातेवाईक घरी आल्याचा आनंद प्रत्येकालाच असतो. पण आनंद व्यक्त करण्याची अशी आगळी वेगळी पद्धत सगळ्यांचच लक्ष वेधून घेणारी ठरली. 

Real story behind the saloni satpute viral dance video pune | पुण्यातल्या मराठमोळ्या सलोनीच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओमागची खरी गोष्ट समोर

पुण्यातल्या मराठमोळ्या सलोनीच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओमागची खरी गोष्ट समोर

Next

देशभरासह मुंबई पुण्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाबाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसंच मृतांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.  सध्या सोशल मीडियावर कोरोनातून बाहेर येत असलेल्या लोकांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. पण असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.  कोरोनातून बरं होऊन आपले नातेवाईक घरी आल्याचा आनंद प्रत्येकालाच असतो. पण आनंद व्यक्त करण्याची अशी आगळी वेगळी पद्धत सगळ्यांचच लक्ष वेधून घेणारी ठरली. 

पुण्यातील आंबेगाव पठार येथील मोहननगर भागात राहणाऱ्या सलोनी सातपुते हिचा कोरोनाबाधित बहीण बरी होऊन घरी आल्यानंतर तीला अफाट आनंद झाला. त्यानंतर तीने  रस्त्यावर उतरवून डिजे लावून केलेला भन्नाट डान्स हा सोशल मीडियावरचा चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये सलोनी ही 'टाय टाय फिश...' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सलोनी इतका जबराट डान्स नक्की कोणासाठी करतेय, अशा प्रश्न तुम्हालाही पडाल असेल.तिच्या या व्हायरल व्हिडिओमागील सत्य आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

पुण्याच्या स्वामी समर्थ भागात वास्तव्यास असलेल्या सलोनीचे आई-वडील, आजी-आजोबा आणि बहीण अर्थात घरातील सगळेच कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एकटी सलोनी कोरोना निगेटिव्ह आहे. त्यामुळे ती घरी आहे. सलोनीची बहीण कोरोनावर मात करून घरी आली तेव्हा तिनं आपल्या बहिणीचं दणक्यात स्वागत केलं. सलोनीला नाचताना पाहून तीची कोरोनातून बरी झालेली बहिण सुद्धा तीच्या आनंदाच सामिल झाली अन् नाचायला लागली.  दरम्यान सलोनीने या व्हिडीओतून मास्क वापरण्याचे आवाहन केलं आहे.

सावधान! आता 'या' ६ प्रकारे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; WHOची धोक्याची सुचना

वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात! ८५ वर्षीय कॅन्सरग्रस्त आजोबांनी पत्नीसह कोरोनाला हरवलं...

Web Title: Real story behind the saloni satpute viral dance video pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.