आयो! ही कार आहे की रोबोट? VIDEO पाहून तुमचा तुमच्याच डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 03:27 PM2020-12-31T15:27:44+5:302020-12-31T15:30:19+5:30
आता एका अनोख्या कारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक ही पाहून चक्रावून गेले आहेत. कारण यातील कार तुम्ही केवळ हॉलिवूडच्या सिनेमात पाहिली असेल प्रत्यक्षात नाही.
जगभरात असे अनेक लोक आहेत जे त्यांची कार-बाइक त्यांच्या आवडीनुसार मॉडीफाय करून घेतात. काही दिवसांपूर्वीच यूपी पोलिसांनी एका डान्सिग कारला नियम तोडण्यावरून फाइन लावला होता. आता एका अनोख्या कारचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक ही पाहून चक्रावून गेले आहेत. कारण यातील कार तुम्ही केवळ हॉलिवूडच्या सिनेमात पाहिली असेल प्रत्यक्षात नाही.
Get. Out... pic.twitter.com/fZqhH47e06
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) December 29, 2020
हा आश्चर्यकारक व्हिडीओ ट्विटर यूजर रेक्स चॅम्पमॅनने शेअर केला आहे. त्याने याच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'गेट आउट'. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख २१ हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे. शेकडो लोकांना यावर कमेंटही केल्या आहेत.
One second it was a car, then I turned my head for a second now it’s a full blown decepticon pic.twitter.com/mAbHZfoEPl
— 𝓢𝓪𝓲𝓷𝓽 𝐍𝐢𝐜𝐤🎄 (@Nicko3277) December 30, 2020
गाज़ियाबाद में इस #DancingCar पर 41,500रु का चालान काटकर पुलिस द्वारा सीज किया गया. गाड़ी पर जातिसूचक शब्द लिखा था.
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 30, 2020
सड़क पर अभद्रता का प्रदर्शन शर्मनाक है.
गाड़ी कस्टमाइज़ करना अच्छी बात है लेकिन ट्रैफिक नियमों के विरुद्ध जाकर, दूसरे राहगीरों को दुख-असुरक्षाबोध कराना गलत है. pic.twitter.com/cfUsaMkVM8
हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी @ipskabra ने शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनला लिहिले होते की, गाजियाबादमध्ये या #DancingCar वर ४१,५०० रूपयांचं चलाना कापून पोलिसांनी ही कार सीज केली आहे. गाडीवर जातीसूचक शब्द लिहिला होता. गाडी कस्टमाइज करणं चांगलं आहे. पण ट्रॅफिकचे नियम पाळले जाणंही महत्वाचं आहे'.