नवऱ्याला होती ‘बाप’ होण्याची इच्छा; बायको गरोदर झाल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:05 PM2021-07-22T14:05:41+5:302021-07-22T14:08:13+5:30

तणाव दूर करण्यासाठी आम्ही हॉलिडे प्लॅन केला. मी हळूहळू चिंतामुक्त व्हायला लागले.

Relationship story couple husband leaves pregnant wife children | नवऱ्याला होती ‘बाप’ होण्याची इच्छा; बायको गरोदर झाल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा

नवऱ्याला होती ‘बाप’ होण्याची इच्छा; बायको गरोदर झाल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा

Next
ठळक मुद्देअखेर १६ महिन्यांनी आम्हाला ज्या गुड न्यूजची प्रतिक्षा होती ती मिळाली. मी सर्वात आधी मॅक्सच्या रिएक्शनची वाट बघत होतीजो लहान मुलांसाठी इतका उत्साहित होता त्यानं सहजपणे ही न्यूज स्वीकारली मला थोडं आश्चर्य वाटलं.एकेदिवशी मॅक्स घरी रात्री उशिरा आला तेव्हा मी त्याला त्याच्या बदललेल्या स्वभावाबद्दल विचारलं

कधी कधी नात्यात इतका मोठा धक्का मिळतो की तो आयुष्यभर विसरू शकत नाही. रिलेशनशिप पोर्टल द डिवोर्स डायरीच्या कॉलममध्ये न्यूझीलँडच्या लिली नावाच्या महिलेने ही कहानी शेअर केली आहे जी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. २५ वर्षाची असताना तिचा बॉयफ्रेंड मॅक्सनं वडील बनण्याची इच्छा व्यक्त केली. मॅक्सला कुणीही भाऊबहिण नव्हतं. नेहमी मोठ्या कुटुंबाची अपेक्षाने त्याने ठेवली होती.

लिलीनं म्हटलं आहे की, मॅक्स नेहमी म्हणायचा मला किमान ३ मुलं हवीत. परंतु मी कधी मुलांबाबत इतकं उत्साहित नव्हते. परंतु मॅक्सला पाहून मी योग्य वेळी याचा विचार करू असं म्हणायचे. २८ व्या वर्षी आम्ही दोघांनी लग्न केले परंतु २ वर्ष फक्त आपल्या करिअरकडे लक्ष देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही दोघांनी निर्णय घेतला ३२ व्या वयानंतर आम्ही मुलांचा विचार करू. परंतु या निर्णयाची वारंवार मॅक्सला आठवण करून द्यायला लागायची. मॅक्स कधीही छोटा मुलगा बघायचा तर खूप आनंदी व्हायचा. अखेर ३२ व्या वर्षानंतर आम्ही फॅमिली प्लॅनिंग सुरू केले. एक वर्ष सलग प्रयत्न करूनही मी प्रेग्नेंट झाली नाही. माझी बहिण जी डॉक्टर आहे तिने सांगितलं खूप तणाव घेतल्यानं कदाचित असं होतं असेल. तणाव न घेता प्रयत्न कर.

तणाव दूर करण्यासाठी आम्ही हॉलिडे प्लॅन केला. मी हळूहळू चिंतामुक्त व्हायला लागले. मॅक्सही सारखा मुलांबाबत विचार करत नव्हता. अखेर १६ महिन्यांनी आम्हाला ज्या गुड न्यूजची प्रतिक्षा होती ती मिळाली. मी सर्वात आधी मॅक्सच्या रिएक्शनची वाट बघत होती. जेव्हा मी प्रेग्नेंट आहे हे मॅक्सला समजलं तेव्हा तो आनंदित झाला आणि मला मिठी मारली. त्यानंतर तो किचनमध्ये गेला. जो लहान मुलांसाठी इतका उत्साहित होता त्यानं सहजपणे ही न्यूज स्वीकारली मला थोडं आश्चर्य वाटलं. त्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यासाठी मॅक्सला सारखं सांगावं लागत होतं. प्रत्येकवेळी तो व्यस्त राहायचा. वेळ मिळाला तरी तो जिमला किंवा मित्रांकडे जायचा.

एकेदिवशी मॅक्स घरी रात्री उशिरा आला तेव्हा मी त्याला त्याच्या बदललेल्या स्वभावाबद्दल विचारलं. इतकी वर्ष ज्या मुलांना जन्म देण्यासाठी मॅक्स मागे लागत होता पण आता तो यात जास्त रस घेत नव्हता. त्यानंतर मॅक्सने जे उत्तर दिलं ते ऐकून मला धक्काच बसला. तो म्हणाला मला, आता मुलं नकोत. मी ७ महिन्याची गरोदर असताना मॅक्सने हे सांगितले. त्यामुळे माझ्यापुढे सगळा अंधार पसरला. मॅक्सचं बोलणं ऐकल्यावर ती रात्र मी कशी काढली? ते मलाच माहिती नाही. दुसऱ्याच दिवशी मॅक्स म्हणाला मी घर सोडून जात आहे. मला वाटलं कदाचित त्याला एका ब्रेकची गरज असेल त्यानंतर तो पुन्हा परतून माझी माफी मागेल. मी एक आठवडा याबाबत कुणालाही सांगितलं नाही. त्यानंतर मी मॅक्सच्या बहिणीला ही माहिती दिली. ती माझ्याकडे आली. तिने मला सांगितले मॅक्स पुन्हा परत येईल पण तसे काही झाले नाही.

डिलिवरीवेळी मॅक्सची बहीण माझ्यासोबत होती. मॅक्सला फोन करून सांगितलं आपल्याला मुलगी झाली. तो म्हणाला मी लवकर परत येईन मात्र त्यानंतर कोरोनामुळे प्लॅन बदलला असल्याचं मॅक्स म्हणाला. काही आठवड्यानंतर मॅक्सला ऑस्ट्रेलियात चांगला जॉब मिळाला तो तिथे शिफ्ट झाला. मी आई झालेली असताना तो माझ्याजवळ नव्हतो. माझ्यासोबत हे घडतंय त्याचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर एकेरात्री मला ३ वाजता मॅक्सला मेसेज आला. तो म्हणाला माझ्याकडून चूक झाली आहे. त्यासाठी मी माफी मागतो. त्यानंतर काही कॉमन फ्रेंडकडून मला कळालं की, मॅक्ससोबत आता त्याची दुसरी गर्लफ्रेंड आहे आणि तो तिच्यासोबतच राहत आहे. हे कळाल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या जगण्याचं कारण माझी मुलगी आहे असं लिलीनं सांगितले.

Web Title: Relationship story couple husband leaves pregnant wife children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.