Video : 'तो' मस्त आरामात रस्त्यावर फिरत होता, समोरून आला गेंडा अन्.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:07 PM2020-04-06T17:07:57+5:302020-04-06T17:16:00+5:30

लॉकडाऊन दरम्यान एक गेंडा रस्त्यावर आरामात फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

This rhino went for inspection in Lockdown in Nepal, video goes viral api | Video : 'तो' मस्त आरामात रस्त्यावर फिरत होता, समोरून आला गेंडा अन्.....

Video : 'तो' मस्त आरामात रस्त्यावर फिरत होता, समोरून आला गेंडा अन्.....

Next

कोरोना व्हायरसमुळे अर्ध अधिक जग लॉकडाऊन आहे. अशात निसर्गात अनेक बदल बघायला मिळत आहे. प्रदूषण कमी झालं, हवा स्वच्छ झाली आणि त्याहूनही आश्चर्यकारक बाब म्हणजे गावांमध्ये, शहरांमध्ये लोकांऐवजी आता रस्त्यावर वेगवेगळे प्राणी दिसू लागले आहे. अशात एक व्हिडीओ समोर आला असून या एक गेंडा रस्त्यावर ऐटीत फिरत असल्याचं दिसत आहे.

आयएफएस ऑफिसर प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की, 'तर या गेंड्याला असं वाटलं की, आता स्थिती आपल्या हातात घ्यावी. म्हणून तो इन्स्पेक्शनसाठी निघाला. जंगलात गेंडे असेच बाहेर येतात, लॉकडाऊन असतानाही'.

45 सेकंदाच्या या व्हिडीओत एकटा गेंडा आरामात फिरताना दिसत आहे. बाजार बंद आहे. एक-दोन लोक आहेत. त्यातील एका मागे गेंडा धावतो तर ती व्यक्ती सुसाट धावत गायब होते. हा अद्भूत व्हिडीओ आतापर्यंत 15 हजार लोकांनी पाहिलाय.

हा व्हिडीओ भारतातील नसून नेपाळमधील चितवन नॅशनल पार्कमधील आहे. काही दिवसांपूर्वी भारतातीलही काही शहरांमध्ये रस्त्यावर वेगवेगळे प्राणी फिरताना दिसले. मुंबईत वेगवेगळी पक्षी, मोरही दिसले. प्राणी आता थोडे दिवस का होईलना त्यांच्या हक्काच्या जागेत फिरू शकत आहेत.

Web Title: This rhino went for inspection in Lockdown in Nepal, video goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.