Rhythm Chanana: ‘छोट्या कपड्यांचा डिझायनर कोण?’ दिल्ली मेट्रो गर्लनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 04:05 PM2023-04-06T16:05:34+5:302023-04-06T16:08:28+5:30

Viral Delhi Metro Girl : छोट्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर एक तरुणी खूप ट्रोल झाली होती. ब्रालेट आणि स्कर्ट घालून तिने मेट्रोतून प्रवास केल्याची घटना समोर आली होती.

Rhythm Chanana Who is the designer of short clothes Delhi Metro viral Girl clearly said social media | Rhythm Chanana: ‘छोट्या कपड्यांचा डिझायनर कोण?’ दिल्ली मेट्रो गर्लनं स्पष्टच सांगितलं

Rhythm Chanana: ‘छोट्या कपड्यांचा डिझायनर कोण?’ दिल्ली मेट्रो गर्लनं स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

Viral Delhi Metro Girl : छोट्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर एक तरुणी खूप ट्रोल झाली होती. ब्रालेट आणि स्कर्ट घालून तिने मेट्रोतून प्रवास केल्याची घटना समोर आली होती. तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओतील मुलीचं नाव रिदम असं आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युझर्सच्या डोक्यात एकच प्रश्न होता तो म्हणजे हे कपडे नक्की कोणी डिझाईन केले. या व्हायरल गर्लनं आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून स्टेटस शेअर करत याबाबत माहिती दिलीये.

सध्या इन्स्टाग्रावर तीचे तेजीनं फॉलोअर्स वाढत आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना तिनं म्हटलं की ती जी आऊटफिट परिधान करते ते अन्य कोणी नाही, तर तिनंच डिझाईन केलेत. “मी माझ्या आऊटफिटचा इंच न् इंच स्वत:च डिझाईन करते, जे मला आऊटफिट कठून खरेदी करतात हा प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी हे आहे,” असं तिनं लिहिलंय. हे डिझाईन करण्यासाठी मशीनचीही गरज नसल्याचं ती म्हणाली.

भीती वाटत नाही
रिदमला आता हळूहळू  स्वातंत्र्याची जाणीव होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून असेच कपडे वापरत आहे. पण हे सगळं प्रसिद्ध होण्यासाठी करत नसल्याचं तरुणीने म्हटलं आहे. महिला सुरक्षेबाबत तिला प्रश्न विचारला तेव्हा तिने मी रोज असेच कपडे घालते पण माझ्यासोबत काहीच झालं नाही असं म्हटलं आहे. तसेच अजिबात भीती वाटत नसल्याचं देखील सांगितलं. छेडछाडी बद्दल विचारताच रिदमने मला याचा फरक पडत नाही, मी हे पूर्णपणे इग्नोर करते असं म्हटलं आहे.

Web Title: Rhythm Chanana Who is the designer of short clothes Delhi Metro viral Girl clearly said social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.