Video: झक्कास.. मेव्हण्याच्या लग्नात थिरकला रोहित शर्मा; पत्नी रितीकासोबत केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:45 PM2023-03-17T12:45:03+5:302023-03-17T12:45:29+5:30

Rohit Sharma Dance, wife Ritika Sajdeh: लग्नाला हजेरी लावल्याने रोहित आज होणारी पहिली वन-डे खेळणार नाही

Rohit Sharma and his wife Ritika Sajdeh dancing in his brother in law marriage watch video here viral trending | Video: झक्कास.. मेव्हण्याच्या लग्नात थिरकला रोहित शर्मा; पत्नी रितीकासोबत केला भन्नाट डान्स

Video: झक्कास.. मेव्हण्याच्या लग्नात थिरकला रोहित शर्मा; पत्नी रितीकासोबत केला भन्नाट डान्स

googlenewsNext

Rohit Sharma Dance with wife Ritika Sajdeh: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या मेव्हण्याच्या लग्नामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळत नाहीये. त्याच्या मेव्हण्याच्या लग्नाआधी संगीत फंक्शनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये रोहित शर्मा त्याची पत्नी रितिका सजदेहसोबत डान्स करताना दिसत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. रोहित मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्माचा असा डान्स तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आणि यासह टीम इंडियाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली. पण सध्या त्याच्या डान्सची जास्त चर्चा होत आहे. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, यंदा एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. याआधी टीम इंडियाला मर्यादित एकदिवसीय सामने खेळायचे आहेत आणि अशा परिस्थितीत रोहितचे प्रत्येक सामन्यात खेळणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज होणार आहे, तर दुसरा सामना 19 मार्चला आणि शेवटचा सामना 22 मार्चला होणार आहे.

Web Title: Rohit Sharma and his wife Ritika Sajdeh dancing in his brother in law marriage watch video here viral trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.