Video - 30 सेकंदात चोरली तब्बल 15 कोटींची Rolls Royce; चावी म्हणून वापरला अँटीना अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 02:24 PM2023-12-05T14:24:10+5:302023-12-05T14:33:06+5:30
चोरट्यांनी शक्कल लढवून कोट्यवधींची कार चोरली आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
आलिशान कारची किंमत ही लाखो रुपये असते. त्यामुळे अनेक जण विशेषत: आपली कार आणि त्याची चावी नीट सांभाळून ठेवतात. पण तरीदेखील कोणी कार चोरली तर नक्कीच धक्का बसेल. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. चोरट्यांनी शक्कल लढवून कोट्यवधींची कार चोरली आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
एका व्यक्तीने अँटीनाला कारची चावी बनवून 15 कोटी रुपयांची Rolls Royce चोरली आहे. व्हिडिओमध्ये चोरट्यांनी 30 सेकंदात नेमकी कशी चोरी केली हे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चोरट्यांनी अँटीनाच्या मदतीने कार कशी चोरली हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
ही हायटेक चोरी ब्रिटनमधील एवेली येथे करण्यात आली आहे. जिथे हुडी घातलेले दोन चोर दिसतात. यामध्ये एक चोर अँटीना घेऊन उभा आहे तर दुसरा गाडीत बसला आहे. अँटीना घेऊन चोर गेटमधून कारच्या दिशेने पावलं टाकतात. काही सेकंदातच गाडी सुरू होते. यानंतर ते कार घेऊन पळून जातात.
Rolls Royce stolen using an antenna to pick up the owner's key signal pic.twitter.com/PKBJG1f1Da
— Crazy Clips (@crazyclipsonly) December 1, 2023
Rolls Royce Cullinan ही SUV आहे. खरं तर ही जगातील सर्वात महागडी एसयूव्ही आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 8 कोटी ते 15 कोटी रुपयांपर्यंत आहे. यामध्ये अनेक कस्टमायझेशनचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
कारची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी Keyless फीचरचा वापर केला. हे फीचर आता अनेक कारमध्ये असतं. यामध्ये कारची एडवान्स कम्प्यूटर सिस्टम Key Fob शी कम्युनिकेट करते. जेव्हा चावी कारच्या आसपास किंवा आतमध्ये असते तेव्हा Key Fob ते डिटेक्ट करतं. यानंतर कार अनलॉक किंवा स्टार्ट करण्याचा ऑप्शन देते.