"एकटं राहणं आवडत नाही", ७४ वर्षीय व्यक्ती ब्रेकअप होताच नवीन प्रियसीच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 12:31 PM2022-08-11T12:31:20+5:302022-08-11T12:32:12+5:30
ब्रिटेनमधील एका व्यक्तीने ९ लग्न केली असून अद्याप तो आणखी एका प्रियसीच्या शोधात आहे.
नवी दिल्ली : जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काच्या प्रेमाची गरज असते. आपल्या सोबत आपल्या हक्काचा जीवनसाथी असेल तर व्यक्तीला एकटेपणा वाटत नाही. मात्र ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला प्रेमात पडण्यासाठी वयाचे कोणतेच बंधन वाटत नाही. त्याला एकटे राहण्याची सवय नसल्याने अशा स्थितीत जगणे असहाय्य असल्याचे त्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे वयाच्या ७४ वर्षी देखील या व्यक्तीमध्ये काहीच बदल झाला नसून तो नवीन जोडीदाराच्या शोधात आहे. या अनोख्या व्यक्तीची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या रॉन को याला ब्रिटेनमध्ये सर्वाधिक लग्न करणारा व्यक्ती म्हणून ओळखले जाते. त्याने २०१९ मध्ये त्याची पत्नी रॉस हन्ससोबत घटस्फोट घेतला होता. दरम्यान तो आता पुन्हा एकदा नवीन जोडीदार शोधत असल्याने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रॉन आता त्याच्या नवव्या पत्नीच्या शोधात आहेत. लक्षणीय बाब म्हणजे २०१९ मध्ये घटस्फोट झालेल्या पत्नीला रॉन कधीच भेटला नव्हता त्यांनी ऑनलाइन लग्न केले पण तिचा स्वभाव न आवडल्याने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
आठ मुलांना दिला जन्म
रॉनने आतापर्यंत एकूण ८ मुलांना जन्म दिला आहे. जेव्हा त्याचा आठव्या पत्नीशी घटस्फोट झाला तेव्हा त्याने एकटे राहून स्वत:ला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ ते २०२२ या ३ वर्षांमध्ये त्याने स्वत:वर लक्ष केद्रींत केले. मात्र आता तो पुन्हा एकदा पत्नीच्या शोधात गुंतला असून त्यासाठी इतरत्र फिरत आहे. रॉन हा एका गंभीर आजारामुळे खूप त्रस्त आहे. डिवॉन लाईव्हशी संवाद साधताना त्याने म्हटले, कोरोना आणि त्याच्या वैयक्तिक आजारामुळे त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे होते. त्यामुळेच मागील ३ वर्ष तो एकटा राहत होता परंतु आता पुन्हा एकदा तो नवरदेव बनण्यास तयार झाला आहे.
एकटे राहणे आवडत नाही
रॉनला एकटे राहणे आवडत नाही असे तो सातत्याने सांगतो. ब्रिटेमनधील सॉमरसेट येथील रहिवासी असलेल्या रॉनच्या म्हणण्यानुसार, त्याला एकटे राहणे अजिबात आवडत नाही. त्यामुळेच त्याने आतापर्यंत तब्बल ९ वेळा लग्न केले आहे. रॉनने आपल्या आयुष्यावर २०१४ मध्ये एक पुस्तक लिहले होते, ज्यामध्ये या सर्व बाबींचा उल्लेख आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा तो एक पुस्तक लिहणार असून 'द वाइफ कलेक्टर' असे या पुस्तकाचे नाव ठेवण्यात आले आहे.