धावत्या ट्रेनमधुन उतरत होती महिला अचानक तोल गेला अन्...पाहा धडकी भरवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 03:44 PM2021-12-07T15:44:55+5:302021-12-07T15:45:08+5:30

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर अपघात होण्यापासून बचावली आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला धडकी भरेल

RPF jawan saves woman from railway accident shocking video goes viral | धावत्या ट्रेनमधुन उतरत होती महिला अचानक तोल गेला अन्...पाहा धडकी भरवणारा Video

धावत्या ट्रेनमधुन उतरत होती महिला अचानक तोल गेला अन्...पाहा धडकी भरवणारा Video

Next

अनेकदा तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये अपघात झाल्याच्या घटना पाहिल्या असतील. ज्या पाहिल्यानंतर अंगावर शहारे उभे राहतात. त्यामुळेच रेल्वे स्थानकावर लोकांना सतर्क राहण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे सांगूनही अनेकदा लोक असे कृत्य करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवावर बेतते. तुम्ही सर्वांनी अशा घटनांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये प्लॅटफॉर्मवर अनेकदा प्रवासी अपघाताला बळी पडतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर अपघात होण्यापासून बचावली आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही प्रवासी चालत्या ट्रेनमधून उतरताना दिसत आहेत. त्याच वेळी, ट्रेन हळू हळू वेग पकडू लागते. ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात एका महिलेने चालत्या ट्रेनमधून उडी मारते आणि धडपडते. काही क्षणांनंतर आणखी एका महिलेने ट्रेनमधून उडी मारली आणि तीही तिच्या अंगावर पडली. मात्र, सुदैवाने काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच त्यांना वाचवण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा (RPF) जवान धावला. सोशल मीडियावर या जवानाचं भरपूर कौतुक होत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या हँडलवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. आता आरपीएफ जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. यासोबतच सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले, महिलेला वाचवल्याबद्दल एसआय बबलू कुमार धन्यवाद. तुम्ही फक्त एकाचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचवला आहे. देव तुमचं कल्याण करो. आणखी एका यूजरने लिहिले – RPFमुळे रेल्वे सुरक्षित आहे. या विभागातील प्रत्येक अधिकारी असाच असावा. दुसर्‍याने लिहिले, सर, तुम्हीच खरे हिरो आहात.

Web Title: RPF jawan saves woman from railway accident shocking video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.