Lamborghini Aventador Crazy XYZ Viral Video: हद्द झाली राव! सहा कोटींची लॅम्बोर्गिनी, त्यात १० रुपयांचे पेट्रोल टाकायला गेला, पहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 16:42 IST2021-12-28T16:41:43+5:302021-12-28T16:42:18+5:30
10 rupees Petrol in Lamborghini Prank: हा व्हिडीओ त्या व्यक्तीच्या अजब मागणीमुळे व्हायरल होत आहे. ६ कोटींच्या Lamborghini Aventador मध्ये १० रुपयांचे पेट्रोल टाकण्यास तो पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना सांगत आहे.

Lamborghini Aventador Crazy XYZ Viral Video: हद्द झाली राव! सहा कोटींची लॅम्बोर्गिनी, त्यात १० रुपयांचे पेट्रोल टाकायला गेला, पहा Video
काही जण व्ह्यूवज वाढविण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी कोटी कोटींच्या कार जाळतात. असे अनेक व्हिडीओ युट्यूब, सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता एक अजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा एक प्रँक आहे. परंतू कोरोडो रुपयांची गाडी आणि एक आणि दहा रुपयांचे पेट्रोल सांगणे नेमकी कोणाची खिल्ली उडविणारे आहे. हा व्हिडीओ Crazy XYZ या यूट्यूब चॅनलवर आहे. (₹10 Petrol in Lamborghini Prank)
Crazy XYZ YouTube चॅनेलवर अपलोड झालेल्या या व्हिडीओला दोन दिवसांत ८७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ २६ डिसेंबरला अपलोड झाला आहे. हा व्हिडीओ त्या व्यक्तीच्या अजब मागणीमुळे व्हायरल होत आहे. ६ कोटींच्या Lamborghini Aventador मध्ये १० रुपयांचे पेट्रोल टाकण्यास तो पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना सांगत आहे. एका पेट्रोल पंपावर तर त्याने १ रुपयाचे नाणे दाखवून पेट्रोल टाकण्यास सांगितले आहे.
यूट्युबर अमित शर्मा याने हा Prank Video शूट केला आहे. तो गुडगावच्या तीन पेट्रोल पंपावर जातो. गेल्यावर तिथे खिशातून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल काढतो आणि मोजू लागतो. १० नोटा मोजून होताच तो त्यात लपविलेली १० रुपयांची नोट काढून १० रुपयांचे पेट्रोल टाक म्हणतो. यावेळी पहिल्या पंपावरील कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया पाहण्यालायक आहे. त्याला १०००० वाटते, मशीनमध्ये नंबर फिड करायला जात असताना त्याला काहीतरी वेगळे ऐकल्यासारखे वाटते, म्हणून थांबतो. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. दुसऱ्या पंपावर फिलर १० रुपये सेट करतो. तर तिसऱ्या पंपावरील कर्मचारी तर १ रुपयाचे पेट्रोल टाक असे ऐकून हवेतच उडतो.