१ नंबर! साडीवाल्या तरूणीचा डान्स पाहून डोळे उघडेच राहतील; लोक म्हणाले अप्सरा अवतरली...

By manali.bagul | Published: December 9, 2020 01:24 PM2020-12-09T13:24:54+5:302020-12-09T13:40:11+5:30

Trending Viral Video in Marathi : अनेकांनी या महिलेला अप्सरा असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ कुठे शुट करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही.

Rukmini vijayakumar bharatanatyam dance video goes viral on twitter | १ नंबर! साडीवाल्या तरूणीचा डान्स पाहून डोळे उघडेच राहतील; लोक म्हणाले अप्सरा अवतरली...

१ नंबर! साडीवाल्या तरूणीचा डान्स पाहून डोळे उघडेच राहतील; लोक म्हणाले अप्सरा अवतरली...

Next

सोशल मीडियावर एका डान्स करत असलेल्या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या घराबाहेरील परिसरात ही तरूणी डान्स करत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरूणी भरतनाट्यमचा प्रकार सादर करत  आहे. या तरूणीचे डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फॅन्स झाले आहेत. अनेकांनी या महिलेला अप्सरा असंही म्हटलं आहे. 
हा व्हिडीओ कुठे शुट करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही.

हा व्हिडीओ पाहताना जराही नजर इकडे तिकडे होत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता घराच्या आजूबाजूचा परिसर सुंदर फुलझाडांनी सजलेला आहे. विशेष म्हणजे कोणतेही वेस्टन ड्रेसेस नाही तर भारतीय साडीच्या पेहरावात या तरूणीने डान्स केला आहे. 

फिरायला जाणार अन् पुन्हा कधीच नाही येणार, ट्रम्प अशा पद्धतीने सोडू शकतात व्हाईट हाऊस...

घरसुद्धा अगदी एखाद्या गावाच्या ठिकाणी असल्याप्रमाणे पारंपारिक ठेवणीतील आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त लोकांना या व्हिडीओला  लाईक केलं असून  १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.  

लय भारी! बाप लेकीच्या नात्याची बातच न्यारी, मुलीचे पाय धुवून तेच दूध प्यायला, पाहा भावूक व्हिडीओ

या तरूणीचे नाव रुख्मिणी विजयकुमार असं आहे. रुख्मिणी एक अभिनेत्री असून तिला भरतनाट्यमची आवड आहे. स्टेज डान्स व्यतिरिक्त अनेक तमिळ सिनेमांमध्ये या रुख्मिणीने काम केले आहे. इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

Web Title: Rukmini vijayakumar bharatanatyam dance video goes viral on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.