क्यूआर कोड घेऊन भारतात नवरदेव शोधत आहे ही रशियन तरूणी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:46 PM2024-06-04T13:46:33+5:302024-06-04T13:47:48+5:30

रशियाच्या मॉस्कोमधून दिनारा नावाची ही तरूणी भारतात आली आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Russian girl finding Indian husband with QR code video goes viral | क्यूआर कोड घेऊन भारतात नवरदेव शोधत आहे ही रशियन तरूणी, व्हिडीओ व्हायरल

क्यूआर कोड घेऊन भारतात नवरदेव शोधत आहे ही रशियन तरूणी, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. यावर अनेक अचंबित करणाऱ्या आणि विचारात पाडणाऱ्या गोष्टी समोर येत असतात. सामान्य कुणाला जर लग्न करायचं असतं तेव्हा वर पाहिजे किंवा वधू पाहिजे अशा जाहिराती वृत्तपत्रामध्ये दिल्या जातात. पण रशियातील एका तरूणीने तर कमालच केली. रशियातील एक तरूणी भारतात तिच्यासाठी नवरदेव शोधण्यासाठी आली आहे. बरं ती वेगवेगळ्या शहरांमध्ये क्यूआर कोड घेऊन तिच्यासाठी नवरा मुलगा शोधत आहे. 

आजकाल जगात काय काय होऊ शकतं हे तुम्ही या घटनेवरून बघू शकता. एक रशियन तरूणी तिच्यासाठी नवरा शोधण्यासाठी थेट भारतात आली आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये मुलाचा शोध घेत आहे. पण नवरदेव शोधण्याची तिची पद्धत लोकांना जरा अजब आणि विचारात पाडणारी वाटत आहे. ती क्यूआर कोड घेऊन नवरदेव शोधत आहे. 

आजच्या डिजिटल जमान्यात स्पर्धा खूप वाढली आहे. अशात तरूणांना आपल्यासाठी योग्य वर किंवा वधू शोधणं फार अवघड झालं आहे. बराच शोध घेऊनही लोकांना मनासारखा जोडीदार मिळत नाही. मनासारख्या जोडीदाराच्या शोधात ही रशियन तरूणी भारतात आली आणि क्यूआर कोड घेऊन मुलगा शोधत आहे. तिने तिच्या इन्स्टा प्रोफाइलचा एक क्यूआर कोड प्रिंट केला आणि ठिकठिकाणी तो घेऊन फिरत आहे. त्यावर लिहिलं आहे की तिला भारतीय नवरा हवा आहे. इच्छुक लोक हा क्यूआर कोड स्कॅन करू शकतात.

रशियाच्या मॉस्कोमधून दिनारा नावाची ही तरूणी भारतात आली आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिचे व्हायरल झालेले हे व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्या इंटरेस्ट दाखवला आहे. लोक तिच्या व्हिडीओवर कमेंट करून लग्नासाठी तयार असल्याचं म्हणत आहेत. 

Web Title: Russian girl finding Indian husband with QR code video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.