रशियन भाषा बोलणं शिकवत होती तरूणी, एकच वाक्य लोकांनी जास्त केलं पाठ आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:29 PM2024-10-07T16:29:12+5:302024-10-07T16:59:49+5:30

Viral Video : सध्या अशाच एका सुंदर तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती रशियन भाषेत रोजची वापरली जाणारी वाक्य लोकांना शिकवत आहे. 

Russian girl teaching speaking Russian language video goes viral | रशियन भाषा बोलणं शिकवत होती तरूणी, एकच वाक्य लोकांनी जास्त केलं पाठ आणि मग...

रशियन भाषा बोलणं शिकवत होती तरूणी, एकच वाक्य लोकांनी जास्त केलं पाठ आणि मग...

Viral Video : सोशल मीडियावर आजकाल बरेच लोक व्हिडिओंच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी दुसऱ्या लोकांना शिकवत असतात. यात बरेच लोक त्यांच्या त्यांच्या देशातील, भागातील भाषाही शिकवतात. सध्या अशाच एका सुंदर तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती रशियन भाषेत रोजची वापरली जाणारी वाक्य लोकांना शिकवत आहे. 

रशियातील ही तरूणी व्हिडिओद्वारे लोकांना रशियन भाषेतील ५ सामान्य वाक्य शिकवत आहे. ज्यांचा वापर आपण रोजच्या जीवनात करतो. लोकांनी या व्हिडिओवर ज्या कमेंट्स केल्या आहेत त्या फारच मजेदार ठरत आहेत. लोक भरभरून एकाच वाक्यावर जोर देत कमेंट्स करत आहेत. 

लाल रंगाच्या ड्रेसमधील ही तरूणी ज्यांना रशियन भाषा शिकायची आहे अशा लोकांना रशियन भाषा शिकवत आहे. तरूणीने पाच वाक्यांची निवड केली. सगळ्यात आधी ती सांगते की, रशियन भाषेत हॅलो कसे म्हणाल. नंतर तिने शिकवलं की, तुम्ही कसे आहात? त्यानंतर रशियन भाषेत माझं तुझ्यावर प्रेम आहे? चौथं वाक्य होतं की, तुम्ही खूप सुंदर आहात? तर शेवटी होतं रशियन भाषेत गुड मॉर्निंग कसं म्हणाला.

तरूणीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर russia_ontravelx नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. लोकांनी या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. मजेदार बाब ही आहे की, तरूणीच्या कमेंट्स बॉक्समध्ये सगळ्यात जास्त कमेंट्स Ya tebyu lyublu म्हणजे ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ या वाक्याच्या आहेत. म्हणजे लोकांनी चार वाक्यांवर जास्त लक्ष न देता या एकाच वाक्यावर भर दिला आहे. 
 

Web Title: Russian girl teaching speaking Russian language video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.