Video : बर्फात राहणाऱ्या अस्वलांचा गावावर हल्ला, लोकांना दुसरीकडे करावं लागलं शिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 01:13 PM2019-02-13T13:13:45+5:302019-02-13T13:16:52+5:30
बर्फात राहणारी अस्वले आपण अनेकदा सिनेमांमध्ये पाहिली आहेत. ही अस्वले किती धोकादायक असतात हेही आपण पाहिलं आहे.
बर्फात राहणारी अस्वले आपण अनेकदा सिनेमांमध्ये पाहिली आहेत. ही अस्वले किती धोकादायक असतात हेही आपण पाहिलं आहे. या अस्वलांमुळे एका गावात इमरजन्सी लागू करण्यात आली आहे. रशियातील Novaya Zemlya हे गाव असून या अस्वलांनी हल्ला केल्यानंतर या गावातील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
डिसेंबर महिन्यापासूनच अस्वलं इथे येत आहेत. त्यांनी या गावात चांगलीच नासधुस केली आहे. पण इथे या अस्वलांना मारणे कायद्याने गुन्हा असल्याने त्यांच्यावर गोळी न झाडण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील लोकांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं आहे.
या गावात तब्बल ५० पेक्षा जास्त अस्वलं दाखल झाली आहेत. यांना पोलर बीअर असं म्हणतात. ही अस्वलांची सर्वात धोकादायक प्रजाती मानली जाते. गावातील लोकांनी सांगितले की, या अस्वलांनी आम्हाला कोणतही नुकसान पोहोचवलं नाही. फक्त ते त्यांना खाण्यासाठी काहीतरी शोधत आहेत.
जगभरात वाढत्या प्रदूषणाचा फटका निसर्गावर पडत आहे. जनावरे शहरांकडे येऊ लागले आहेत. खरंतर ग्लोबल वार्मिंगमुळे आर्कटिक वितळत आहे. त्यामुळे पोलर बीअर पोट भरण्यासाठी गावांमध्ये येत आहेत.
खरंतर मनुष्यांच्या चुकांमुळे जनावरांवर उपासमारीची वेळ येत आहे. जंगलांची कत्तल रोखली गेली पाहिजे. नाही तर याचे फार जास्त दुष्परिणामही भोगावे लागणार आहेत.