पाय पसरून बसणाऱ्या पुरुषांवर पाणी का फेकतीये ही तरुणी? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:12 PM2018-09-27T15:12:10+5:302018-09-27T15:26:55+5:30
सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एक मुलगी ट्रेनमध्ये पाय पसरवून बसलेल्या पुरुषांवर पाणी फेकताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एक मुलगी ट्रेनमध्ये पाय पसरून बसलेल्या पुरुषांवर पाणी फेकताना दिसत आहे. या फोटोत दिसणारी ही मुलगी रशियातील असून सध्या तिची चर्चा होत आहे. Anna Dovgalyuk असं या मुलीचं नाव असून ती जिथेही पाय पसरून बसणारे पुरुष दिसतील तिथे त्यांच्यावर पाणी फेकते. असे का? रशियातील पुरुषांकडून अशी काय चूक झाली आहे? चला जाणून घेऊ काय आहे प्रकरण...
अॅना एक अॅक्टिव्हिस्ट आहे. कायद्याचं शिक्षण घेत आहे. सध्या ती पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये पाय पसरवून बसणाऱ्या पुरुषांवर ब्लीचपासून तयार लिक्विड टाकते. याचा नंतर डागही पडतो. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे.
पुरुषांच्या पाय पसरून बसण्याला Manspreading असे म्हटले जाते. १९१५ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क एक गुन्हा मानला गेला. २०१३ मध्ये सोशल मीडियावर पुन्हा एकदा हा मुद्दा गाजत गाजला होता. असे म्हटले जात आहे की, सार्वजनिक जागांवर पुरुषांचं पाय पसरून बसणं हे असभ्यपणाचं लक्षण वाटतं. दरम्यान, इराणमध्ये आजही Manspreading वर २ ते ४ महिन्यांची शिक्षा दिली जाते.
अॅना या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना खासकरुन पुरुषांना Manspreading बाबत जागरुक करत आहे. न्यूयॉर्कच्या मेट्रोमध्ये आजही ७५ डॉलरचा दंड भरावा लागतो. जपानमध्येही याबाबत कठोर नियम आहेत. असे यासाठी केले जाते कारण एक व्यक्ती अशाप्रकारे पाय पसरून आरामात बसली तर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये दुसऱ्यांना त्रास होतो.