Video - एनर्जी ड्रिंक प्रमोट करण्याच्या नादात प्रसिद्ध YouTuber ने तोडली कोट्यवधींची लॅम्बोर्गिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 02:12 PM2023-03-06T14:12:22+5:302023-03-06T14:13:56+5:30
वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कोट्यवधींची कार खराब होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे कंटेंट व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून कधी कधी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. त्याच वेळी, काही लोक सोशल मीडियावर रातोरात स्टार बनण्यासाठी विचित्र आणि आश्चर्यकारक स्टंट करताना दिसत आहेत, जे अलीकडेच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कोट्यवधींची कार खराब होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत.
एका रशियन यूट्यूबरचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये तो त्याची करोडोंची चमकणारी पांढरी लॅम्बोर्गिनी कार (Lamborghini Urus SUV) एका झटक्यात उद्ध्वस्त करताना दिसत आहे. या रशियन यूट्यूबरचे नाव मिखाईल लिटविन असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ एका एड शूटचा आहे. एनर्जी ड्रिंक्सच्या रेंजचा प्रचार करण्यासाठी करोडो रुपयांच्या लॅम्बोर्गिनी कारचा चक्काचूर होत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. भारतात या कारची सुरुवातीची किंमत 3.15 कोटी रुपये आहे.
सर्वप्रथम या स्टंटचा संपूर्ण सेटअप व्हिडिओमध्ये पाहता येईल. व्हिडिओमध्ये पुढे, एका मोठ्या क्रेनमधून एक ड्रिंक येत आहे आहे. त्याच वेळी, व्हिडिओमध्ये खाली एक चमकणारी कार दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती पळून जाताच क्रेनमधून लटकलेले ड्रिंक गाडीवर पडते, ज्यामुळे करोडो रुपयांची कार काही सेकंदात खराब होते. हा संपूर्ण स्टंट केवळ एनर्जी ड्रिंक्सला प्रमोट करण्यासाठी केला गेला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर mikhail_litvin नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो खूप बघितला जात आहे आणि लाइक केला जात आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 3 लाख 11 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या युजर्सनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"