Millionaire Kids : डायपर घालायच्या वयात सुरू केली कमाई, आज आहे 800 कोटींचा मालक; काय करतो हा..?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 01:21 PM2023-04-11T13:21:21+5:302023-04-11T13:35:44+5:30

Millionaire Kids : हा मुलगा सध्या वर्षाला सूमारे 150 कोटी रुपये कमावतो.

Ryan world, Millionaire Kids : Ryan Kaji Started Earnings at age of three; Today this boy is the owner of 800 crores | Millionaire Kids : डायपर घालायच्या वयात सुरू केली कमाई, आज आहे 800 कोटींचा मालक; काय करतो हा..?

Millionaire Kids : डायपर घालायच्या वयात सुरू केली कमाई, आज आहे 800 कोटींचा मालक; काय करतो हा..?

googlenewsNext

Millionaire Kids : आज आम्ही तुमची ओळख अशा मुलाशी करुन देणार आहोत, ज्याने अवघ्या लहान वयातच कोट्यवधी रुपये कमावले आहेत. रायन काझी असे त्या मुलाचे नाव असून, वयाच्या 9 व्या वर्षी रायनने 800 कोटींहून अधिक संपत्ती कमावली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, रायन नेमकं काय काम करतो, ज्यामुळे त्याने इतके कोटी कमावले आहेत. 

अशी झाली सुरुवात...
रायनचा जन्म अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरात झाला. रायनला लहानपणापासूनच खेळण्यांची खूप आवड होती आणि त्याच्या आई-वडिलांनी तो अवघ्या 3 वर्षांचा असताना त्याच्या नावाने YouTube चॅनेल Ryans World (ryans.world) सुरू केले. तो घरात खेळायचा आणि त्याचे आई-वडील त्याचे व्हिडिओ बनवून YouTube वर टाकायचे. हळूहळू त्याची लोकप्रियता वाढली आणि आता तो यूट्यूबच्या जगात सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी बनला आहे. फोर्ब्सने रायनचा वयाच्या 7 व्या वर्षीच जास्त कमाई करणाऱ्या युट्युबर्सच्या यादीत समावेश केला होता.

वार्षिक 150 कोटी कमाई
रायनचे व्हिडिओ पाहणारे दर्शक 3 ते 6 वयोगटातील लहान मुलं आहेत. सध्या, YouTube Ryan's World वर त्याचे 3.39 कोटी पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत तर आतापर्यंत या चॅनेलवर 53.2 अब्ज व्ह्यूज आले आहेत. या स्वप्नवत यशासाठी रायनला फेव्हरेट मेल सोशल स्टारच्या किड्स चॉईस अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले आहे. 2018 मध्ये रायनची कमाई सुमारे 142 कोटी रुपये होती. सध्या त्याच्या कमाईचा आकडा आता वार्षिक 150 कोटींच्या पुढे गेला आहे. फोर्ब्सनुसार, रायन 9 वर्षांचा होता तोपर्यंत त्याची उलाढाल 800 कोटींहून अधिक होती.

1600 उत्पादनांना रायनचे नाव
रायनची लोकप्रियता किती वाढली आहे, याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, आज जगभरातील 30 देशांमध्ये त्याचे नाव वापरले जाते. रायनच्या नावाने जगभरात 1,600 उत्पादने विकली जातात. यामध्ये स्केचर्स, पायजामा, रोब्लॉक्स, बेडिंग, घड्याळे, खेळाच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, फर्निचर, टूथपेस्ट आणि खेळणी यांचा समावेश आहे.

मुलाच्या नावावर कंपनी
रायनच्या कुटुंबाने सनलाईट एंटरटेनमेंट नावाची निर्मिती कंपनीही उघडली आहे. ही कंपनी कौटुंबिक कंटेट तयार करते, जी मुलांना शिकण्यास आणि वाढण्यास मदत करते. सध्या ही कंपनी 8 YouTube चॅनेलचे व्यवस्थापन करत आहे. कंपनीमध्ये व्हिडिओग्राफर, संपादक, अॅनिमेटर, लेखक आणि व्हॉइस-ओव्हर कलाकारांसह एकूण 30 कर्मचारी आहेत. या YouTube चॅनेलद्वारे दर आठवड्याला 25 व्हिडिओ रिलीज केले जातात.
 

Web Title: Ryan world, Millionaire Kids : Ryan Kaji Started Earnings at age of three; Today this boy is the owner of 800 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.