भर मंडपात सालीने जिजांजीकडे केली अजब मागणी, मागणी ऐकुन नवऱ्याला धडकीच भरली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 05:27 PM2022-02-09T17:27:50+5:302022-02-09T17:35:51+5:30

मेव्हणीने लग्नात नवरदेवाकडे असं काही मागितलं की त्याला फक्त ऐकूनच धडकी भरली.

saali asks jija 1 Lakh money for jooti video goes viral on social media | भर मंडपात सालीने जिजांजीकडे केली अजब मागणी, मागणी ऐकुन नवऱ्याला धडकीच भरली

भर मंडपात सालीने जिजांजीकडे केली अजब मागणी, मागणी ऐकुन नवऱ्याला धडकीच भरली

googlenewsNext

लग्नात नवरदेवाला (Wedding video) त्रास देण्यात नवरीच्या बहिणी-मैत्रिणी एक संधी सोडत नाहीत. लग्नामध्ये दाजी-मेव्हणीत वाद नाही तर त्या लग्नाला तशी मजाही नाही (Jija saali video). अशाच एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात मेव्हणीने लग्नात नवरदेवाकडे असं काही मागितलं की त्याला फक्त ऐकूनच धडकी भरली.

दाजी-मेव्हणीत लग्नात सर्वात जास्त वाद होत असेल तर बूट चोरीवेळी. मेव्हणी नवरदेवाचे बूट चोरून ठेवते आणि त्याबदल्यात नवरदेवाकडून पैसे मागते. पैसे दिल्यानंतरच ती त्याला बूट परत करते. बूट चोरी करण्यासाठी मेव्हण्यांना भरपूर पाप बेलावे लागतात, तर ते बूट मिळवण्यासाठी नवरदेवाचेही चांगलेच हाल होतात. दाजी-मेहुणीतील बूट चोरीवरून झालेलं असंच हे भांडण आहे.

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांसोबत उभे आहेत. त्यांना तरुणींनी चारही बाजूंनी घेरलं आहे. आपल्या दाजींना मेव्हण्यांनी अडवून ठेवलं आहे. लग्नात सर्वांसमोरच मेव्हण्या दाजींकडे काहीतरी मागणी करताना दिसत आहेत. मेव्हणीच्या हातात बूट दिसत आहेत. नवरदेवाकडे ते तब्बल १ लाख रुपयांची मागणी करतात. आकडा ऐकून तर नवरदेव शॉकच होतो. तो ५ हजार रुपये देण्याची तयारी दाखवतो. पण मेव्हणी काही त्याला सोडत नाही. दाजीही त्यांची मजा घेतो. जेव्हा मेव्हणी पैसे दे दो म्हणतात तेव्हा नवरदेव जूते ले लो असं म्हणतो.

अखेर नवरीबाई त्या दोघांमध्ये मध्यस्थी करते आणि २१ हजार रुपये द्यायला सांगते. दाजी-मेव्हणीत डील होते. नवरदेव मेव्हण्यांच्या हातात पैशांचं पाकिट ठेवतो आणि मेव्हणी आपल्या हाताने दाजींच्या पायात बूट घालते.

Web Title: saali asks jija 1 Lakh money for jooti video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.