बम बम भोले! हिमालयाच्या गोठवणाऱ्या थंडीत ध्यानसाधना करणाऱ्या साधूचा व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 11:51 AM2020-02-17T11:51:06+5:302020-02-17T11:52:03+5:30
ट्विटरवर हिमालयातील एका साधूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात एक साधू बर्फाच्या डोंगरात ध्यानसाधना करताना दिसत आहे.
ट्विटरवर हिमालयातील एका साधूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात एक साधू बर्फाच्या डोंगरात ध्यानसाधना करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या साधूच्या अंगावर एकही कपडा नाही. तर त्याच्यासोबत एका डॉगी आहे. हा व्हिडीओ हिमालयात -४५ डिग्री तापमानात एका जवानाने रेकॉर्ड केल्याचं याला कॅप्शन देण्यात आलय.
This video is recorded in the Himalayas in minus 45 degree temperature by an army soldier. He came across a sadhu walking with a dog doing his morning prayers in the snow. pic.twitter.com/ynBcsMRsTB
— IndiaDivine.org (@indiadivine) February 13, 2020
गोठवणाऱ्या थंडीतील साधूचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, आजूबाजूला दिसणारा बर्फ पाहून हे नक्की की, तिथे तापमान कमीत कमी असेल.
More pic.twitter.com/OHW6Q8F1MG
— avadhut1972 (@avadhut1972) February 14, 2020
दुसऱ्या एका व्हिडीओत साधू डोंगराहून खाली कोलांटउड्या मारत उतरत आहे. त्याचा कुत्राही त्याच्यासोबत आहे. हा हिमालयातील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक इतरही काही साधूंचे व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करत आहेत. एका दुसऱ्या व्हिडीओत साधू बर्फाने पाण्याने केस धुतांना दिसत आहे.
Another one ....
— वकील सा'ब 2.0 🇮🇳 (@sushilvashisth) February 15, 2020
हर हर महादेव
🙏 pic.twitter.com/OZysxh3u06
Har Har Mahadev 🙏🙏🙏🙏🙏
— Only Namo for India (@Dhiren35503699) February 14, 2020
Sadhana & tapasya 🙏
— Priyansha (@_Priyansha__) February 14, 2020
इतक्या थंडीत हे साधू हे करत आहेत किंवा ज्याप्रकारे ते राहू शकतात त्याला लोक साधनेचा परिणाम सांगत आहेत. काहीही असो पण या लोकांची सहनशक्ती कमालीची असते.