बापमाणसाला सलाम! 'झोमॅटो'चा डिलिव्हरी बॉय लेकीला घेऊन पार्सल द्यायला पोहोचतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 02:29 PM2023-07-10T14:29:38+5:302023-07-10T14:31:05+5:30
व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून 'त्या' माणसाची स्तुती केली जात आहे
Zomato Delivery boy with baby Viral Video: इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सोशल मीडियामध्ये एखाद्या खूप छोटाशा कृतीला जगभर पोहोचवण्याची ताकद असते. झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपल्या लहान बाळाला आपल्या कडेवर घेऊन ग्राहकाला फूड डिलिव्हरी करायला पोहोचल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला होत आहे. अनेकांनी त्या माणसाबद्दल सहानुभूती दाखवली आहे, तर काहींनी त्याला, पैसे कमवण्यासाठी इतर नोकरी-धंदा शोधण्याचा पर्याय सुचवला आहे. फूड डिलिव्हरी करतानाही आपल्या बाळाची काळजी घेणाऱ्या या माणसाच्या निर्णयाचे इंटरनेटवर स्वागत तर होत आहेच, पण त्यासोबतच वाहवा देखील मिळत आहे. एका फूड व्लॉगरने हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली; झोमॅटो डिलिव्हरी बॉय त्याच्या बाळासह दिवसभर उन्हात फिरतो. यावरून हे सिद्ध होते की माणसाने मनापासून काही ठरवलं की तो काहीही करू शकतो." सोशल मीडिया युजर्सनी आपल्या लहान मुलांची काळजी घेत असतानाही कठोर परिश्रम करण्याच्या मनुष्याच्या निर्धाराची प्रशंसा केली.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया
ही क्लिप इतकी व्हायरल झाली की झोमॅटोने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि त्या माणसाला मदतीचा हात पुढे केला. झोमॅटोने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, "कृपया ऑर्डरचे तपशील खाजगी संदेशात शेअर करा जेणेकरून आम्ही डिलिव्हरी पार्टनरपर्यंत पोहोचू आणि मदत करू शकू." Instagram वर शेअर केल्यापासून, व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने टिप्पणी केली, "अशा डिलिव्हरी एजंटना मदत केल्याबद्दल आणि त्यांना पैसे कमवण्याचे व्यासपीठ दिल्याबद्दल झोमॅटोचे आभार." दुसर्या यूजरने लिहिले की, “हे खूप प्रेरणादायी आहे. परिस्थिती कशीही असो, आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत." तर एका युजरने लिहिले, "बाप हाच खरा हिरो असतो."