धक्कादायक! धावत्या कारचा फिल्मी स्टाईलसारखा अपघात, व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 05:17 PM2019-07-25T17:17:34+5:302019-07-25T17:18:19+5:30
सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून एखाद्या फिल्ममधील सिनप्रमाणेच अपघात झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून एखाद्या फिल्ममधील सिनप्रमाणेच अपघात झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक गाडी गाडी रस्त्यावरून जात असताना अचानक पलटी झाली. गाडीचा ड्रायव्हर त्या गाडीतच अडकलेला होता. परंतु काही लोकांना प्रसंगावधान राखून गाडी सरळ करत ड्रायव्हरचा जीव वाचवला. या फिल्मी स्टाइल अपघाताचा एरियर व्ह्यू फार व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ ABC न्यूजने शेअर केला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, आम्ही या अपघाताला फिल्मी स्टाइल अपघात का म्हणत आहोत?
Good Samaritans stopped on both sides of the highway in a dramatic rescue of a pickup truck driver whose vehicle overturned in Illinois. The group banded together to flip the truck on its side and help the driver climb out of the truck. https://t.co/pgFkAYAIa2pic.twitter.com/nCQcAsTJ4u
— ABC News (@ABC) July 22, 2019
अपघात झाल्यानंतर आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या काही लोकांनी धक्का देऊन गाडी सरळ केली आणि ड्रायव्हरला बाहेर काढलं. ड्राइवरचं नाव ऑरलेंडो हरनेनडेज सांगण्यात येत असून अपघातात तो किरकोळ जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
This brought tears to my eyes. Black, White, Latino, young and old. THIS is America and it's beautiful!!!
— Marie 🗽🌊 🦅 BE A VOTER!!!! (@Merrirrro) July 23, 2019
अपघाताच्या व्हिडीओला आतापर्यंत 22 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 5 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच प्रसंगावधान राखून ड्रायव्हरचा जीव वाचवणाऱ्या लोकांचं ट्विटर यूजर्सकडून कौतुक करण्यात येत आहे.
This is everything that’s amazing about America wrapped up in 3 plus minutes. Bless all these folks
— Renegade Cowboy🐾🐾 🌊⚓️🌊🐾🐾 (@Rene_gadeCowboy) July 22, 2019
Americans doing what we do best—-helping others in need—-makes me cry with joy ❤️
— Deep River (@DeepRiverTM1996) July 22, 2019
You are all heroes, every one of you! 😇 pic.twitter.com/PuFK29st7T
— Ladybug (@ChelseaStarfish) July 22, 2019
They didn't do it to be heroes, they did it to help out a fellow American. Someone was in desperate need, and these men answered the call to help. Out of the kindest of their hearts. They weren't in it for the glory or the coverage. They were just trying to help. God Bless them
— Morgan Ellis (@Morgan1799) July 22, 2019
एका ट्विटर यूजरने असं लिहिलं आहे की, 'हे लोक कोणताही पब्लिसिटी स्टंट करत नसून त्यांनी एका गरजू माणसाचा जीव वाचवला आहे. त्या ड्रायव्हरला मदतीची गरज होती आणि त्या लोकांनी त्याची मदत केली.'