सपना चौधरीच्या गाण्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:50 PM2019-04-01T16:50:00+5:302019-04-01T17:09:55+5:30
सपना चौधरीची गाण्यांनी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे.
नवी दिल्लीः सपना चौधरीची गाण्यांनी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. सपना चौधरीची अनेक गाणी ऐकणाऱ्याला अक्षरशः नाचायला लावतात. 'तेरी आख्या का यो काजल' या सपना चौधरीच्या गाण्यावर साध्या व्यक्तीनं नव्हे, तर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ठेका धरला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका कार्यक्रमात या महिला आयपीएस अधिकारी सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकल्या आहेत.
शनिवारी (30 मार्च) रोजी दक्षिण पश्चिम दिल्लीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. ऑल वुमन संपर्क सभेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सुनो सहेली कार्यक्रमात उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी स्टेजवर जाऊन नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे. सपना चौधरीचं प्रसिद्ध गाणं 'तेरी आख्या का यो काजल' खूप प्रसिद्ध आहे. कार्यक्रमादरम्यान गाणं वाजायला लागल्यानंतर उपस्थित एक-दोन महिलांनी स्टेजवर जाऊन नाचायला सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांतील महिलाही स्टेजवर आल्या आणि त्यांनी त्या गाण्यावर ठेका धरला.
महिलाओं को प्रोत्साहित करने के लिए सुनो सहेली कार्यक्रम में जमकर नाचीं महिला आईपीएस बेनिता मैरी जेकर और महिला पुलिसकर्मी,सपना चौधरी के गाने पर डांस का ये वीडियो pic.twitter.com/2QSZI4cXtP
— Mukesh singh sengar (@mukeshmukeshs) April 1, 2019
या महिला आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेक महिलांना जोशात डान्स केला. हा कार्यक्रम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी होता. सपना चौधरीनं बिग बॉस 11मध्ये जबरदस्त प्रसिद्धी मिळवली आहे. सपना चौधरीनं स्वतःच्या करियरची सुरुवात ऑर्केस्ट्रा पार्टीनं केली. सपना चौधरी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्येही स्वतःच्या डान्सचा जलवा दाखवला आहे.